MI-W vs DC-W Match prediction : महिला प्रीमियर लीग (WPL) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना आज (26 मार्च) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता बेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे सुरू होईल. दरम्यान डब्ल्यूपीएलचे हे पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी दोन्ही संघ सर्वोत्परी प्रयत्न करणार हे नक्की आहे. चला तर जाणून घेऊ या सामन्यात कोणता संघ जिंकू शकतो.
स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये सर्व संघ एकमेकांविरुद्ध 2-2 सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स देखील दोनदा आमनेसामने आले आहेत. साखळीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघ जवळपास सारखेच दिसले. मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 8 गडी राखून विजय मिळवला. त्याचवेळी दुसऱ्या चकमकीत दिल्ली कॅपिटल्सने 9 गडी राखून विजय मिळवला. साखळी सामन्यांतील दोघांचे सामने पाहून कोणालाही विजेता म्हणणे सोपे नाही. अशा स्थितीत अंतिम सामन्यात कमालीची उत्सुकता पाहायला मिळणार हे नक्की.
साखळी सामन्यांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी उत्कृष्ट
स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये दोन्ही संघांकडून उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. मुंबईने महिला प्रीमियर लीगची सुरुवात सलग पाच विजयांसह केली. त्याचवेळी दिल्लीने पहिले दोन सामने जिंकले होते. दोन्ही संघांना 8 लीग सामन्यांपैकी 6-6 असे जिंकण्यात यश आले. चांगल्या नेट रनरेटमुळे, दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि संघाने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला, तर मुंबईला यूपी वॉरियर्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागला.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग-11
विजेतेपदाच्या लढतीसाठी दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना, मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशा स्थितीत दिल्लीला आपल्या मागील सामन्यांचे प्लेइंग-11 संयोजन कायम ठेवायचे आहे. दुसरीकडे, जर आपण मुंबई इंडियन्सबद्दल बोललो तर त्यांनी त्यांच्या शेवटच्या सामन्यात (एलिमिनेटर) यूपी वॉरियर्सचा 72 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत संघाला त्याच प्लेइंग इलेव्हनसह उतरायला आवडेल.
दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य प्लेईंग इलेव्हन- मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, अॅलिस कॅप्स, जेमिमा रॉड्रिग्ज, मारिजाने कॅप, तानिया भाटिया (विकेटकीपर), जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, पूनम यादव.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक.
हे देखील वाचा-