Prithvi Shaw in IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामात पृथ्वी शॉ याची बॅट शांतच आहे. यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल दमदार कामगिरी करत आहेत, पण पृथ्वी शॉ याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पृथ्वी शॉ सलग तिसऱ्या सामन्यात स्वस्तात माघारी परतला. राजस्थानविरोधात पृथ्वी शॉ याला खातेही उघडता आले नाही. पहिल्याच षटकात त्याला बोल्टने तंबूचा रस्ता दाखवला. 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. थ्वी शॉ आणि मनिष पांडे लागोपाठ बाद झाले. पृथ्वीचा खराब फॉर्म दिल्लीसाठी डोकेदुखी ठरत आहे. 


प्लेईंग 11 मधून बाहेर -
दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकणाऱ्या दिल्ली संघात तीन बदल करण्यात आले. यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे सलामी फलंदाज पृथ्वी शॉ याला प्लेईंग 11 मधून बाहेर बसवलेय. दिल्लीला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, यामध्ये पृथ्वी शॉ याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. लखनौविरोधात 12 तर गुजरातविरोधात सात धावांची खेळी केली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातून पृथ्वी शॉ याला डच्चू दिला आहे. पृथ्वी शॉ राजस्थानविरोधात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला... पण त्याला इम्पॅक्ट पाडता आला नाही. तो गोल्डन डकचा शिकार झाला... 


पृथ्वी शॉ राजस्थानविरोधात शून्यावर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. नेटकऱ्यांनी पृथ्वी शॉ याची खिल्ली उडवली आहे.. पाहा नेटकरी काय म्हणाले.