RCB In IPL 2023 : करो या मरो लढतीत आरसीबीने राजस्थानचा 112 धावांनी पराभव केला. या विराट विजयासह आरसीबीने आपला नेटरनर मायनसमधून प्लसमध्ये आणलाय. या विजायामुळे आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा जिवंत आहेत. आरासीबीचे 12 सामन्यात 12 गुण झाले आहेत. उर्वरित दोन सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचे आरसीबीचे स्वप्न असेल. पण त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरू शकते. कारण, पंजाब, मुंबई, लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामन्यावर आरसीबीचे प्लेऑफचे गणित अवलंबून राहणार आहे. 


फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सध्या गुणतालिकेत 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. आरसीबीने 12 सामन्यांमध्ये 6 सामने जिंकले आहे, तर 6 सामने गमावले आहेत. आरसीबीचे उर्वरित सामने सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघाविरुद्ध बाकी आहेत. हैदराबाद संघाचे स्पर्धेतील आव्हान संपलेय.. तर गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघ दबावाशिवाय मैदानात असतील. आरसीबीच्या संघावर विजयाचा दबाव असेल. अशा स्थिती आरसीबी कशी कामगिरी करतेय.. ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


बेंगलोरला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्यांना उर्वरित सहा संघांकडून कडवी टक्कर मिळणार आहे. प्लेऑफमधील जागा पक्की करण्यासाठी बेंगलोरला उर्वरित दोन्ही सामने जिंकावेच लागणार आहे, तसेच अन्य संघ 16 गुणांपर्यंत पोहचणार नाही अशी अपेक्षा करावी लागेल किंवा जरी पोहोचले, तरी त्यांचा नेट रनरेट कमी रहावा अशी अपेक्षा करावी लागेल. तसेच जर एक जरी सामना पराभूत झाला, तर त्यांना अन्य संघांनी 14 गुणांपर्यंत पोहचू नये अशी आशा करण्याबरोबरच स्वत:चा नेट रनरेटही चांगला ठेवावा लागणार आहे. मात्र, जर बेंगलोरने उर्वरित दोन्ही सामने पराभूत झाले, तर मात्र त्यांचे आव्हान संपुष्टात येईल.


16 गुण झाल्यानंतरही आरसीबीला काय करावे लागेल -


पंजाबचे दोन सामने बाकी आहेत. त्यापैकी एका सामन्यात पराभूत झाल्यास आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचेल. पंजाबचे उर्वरित दोन्ही सामने हैदराबाद आणि दिल्लीविरोधात आहेत. या दोन्ही संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. त्याशिवाय लखनौ आणि मुंबई यांच्यातील आज होणाऱ्या सामन्याकडेही आरसीबीचे लक्ष असेल.. आज लखनौचा पराभव झाल्यास.. आरसीबीचे प्लेऑफचे चान्स वाढणार आहेत.  


आणखी वाचा :


GT in IPL Playoffs: गतविजेत्याची यशस्वी घौडदोड, यंदा क्वालिफाय होणारा गुजरात पहिला संघ
SRH In IPL 2023 : हैदराबादच्या नवाबांचे आयपीएलमधील आव्हान संपले, मुंबई-आरसीबीची डोकेदुखी वाढली
IPL 2023, GT vs SRH : शमी-शर्माचा भेदक मारा, गुजरातचा हैदराबादवर 32 धावांनी विजय