GT vs SRH, Match Highlights: मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर गुजरातने हैदराबादचा 34 धावांनी पराभव केला. गुजरातने दिलेल्या 189 धावांच्या आव्हानाचा आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 154 धावांपर्यंत मजल मारु शकला. शमी आणि शर्मा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. हैदराबादकडून क्लासेन याने एकाकी झुंज दिली. या पराभवामुळे हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. तर गुजरात क्वलिफाय होणारा पहिला संघ ठरलाय.
189 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. हैदराबादचे आघाडीचे फलंदाज तंबूत परतले. पावरप्लेमध्ये हैदराबादने सामना गमावला. हेनरिक क्लासेन आणि भुवनेश्वर कुमार यांनी एकाकी झुंज दिल्यामुळे हैदराबादचा मानहानीकारणक पराभव टळला. पावरप्लेमध्ये हैदराबादचा अर्धा संघ तंबूत परतला होता. यामद्ये कर्णधार एडन मार्करम याचाही समावेश होता.
अनमोलप्रीत सिंह आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी पाच पाच धावावर बाद झाले. मोहम्मद शमीने अनमोलप्रीतला तर यश दयाल याने अभिषेकला तंबूत पाठवले. एडन मार्करम दहा धावांवर बाद झाला. शमीने त्याला तंबूत धाडले. राहुल त्रिपाठी अवघ्या एका धावेवर शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. सनवीर सिंह सात धावा काढून तंबूत परतला. अब्दुल समद चार धावांवर बाद झाला. हैदराबादच्या एकाही फलंदाजांनी मोठी खेळी केली नाही. ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. हैदराबादच्या फलंदाजांनी शमी-शर्मा जोडीपुढे गुडघे टेकले.
हेनरिक क्लासेन आणि भुवनेश्वर कुमार यांनी दमदार फलंदाजी करत हैदराबादचा दारुण पराभव टाळला. क्लासेन याने 64 धावांची खेळी केली. क्लासेन याने तीन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 64 धावांची खेळी केली. तर भुवनेश्वर कुमार याने 27 धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने तीन चौकार लगावले. 59 धावांवर हैदराबादची सातवी विकेट पडली होती.. त्यानंतर भुवनेश्वर कुमारला साथीला घेत क्लासेन याने हैदराबादचा डाव सावरला. क्लासेन आणि भुवनेश्वर कुमार यांनी आठव्या विकेटसाठी 47 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. क्लासेन आणि भुवनेश्वर कुमारशिवाय मयांक मार्केंडेय याने नाबाद 18 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले.
शमी-शर्माचा भेदक मारा -
मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी भेदक मारा केला. दोघांनी हैदराबादच्या फलंदाजांना तंबूत धाडले. शर्मा-शमी या जोडीपुढे हैदराबादच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मोहम्मद शमी याने 4 षटकात 21 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्यात. तर मोहित शर्मा याने चार षटकात 28 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्यात. यश दयाल याला एक विकेट मिळाली.