SRH In IPL 2023 : दिल्लीनंतर आता हैदराबादचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. हैदराबादच्या संघाला 12 सामन्यात आठ पराभवाचा सामना करावा लागलाय. आज नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात गुजरातने हैदराबादचा पराभव केला. या पराभवासह हैदराबादचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. एडन मार्करमच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाने यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी केली आहे. हैदराबादला फक्त चार सामन्यात विजय मिळवता आलाय. उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवत स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल.  गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंग अशा सर्वच क्षेत्रात हैदराबादचा संघ यंदा अपयशी ठरला.. याचा फटका त्यांना गुणतालिकेत बसलाय. 


12 सामन्यात हैदराबाद संघाची कामगिरी कशी झाली पाहा... 


2 एप्रिल 2023 - राजस्थान रॉयल्सने हैदराबादचा 72 धावांनी दारुण पराभव केला. हैदराबादची आयपीएलची सुरुवात निराशाजनक झाली. 


7 एप्रिल 2023 - लखनौ सुपर जायंट्स संघाने हैदराबादला पाच विकेट आणि 24 चेंडू राखून हरवले.. 


9 एप्रिल 2023 - हैदराबादने पहिल्या विजयाची नोंद केली. हैदराबादने पंजाबला आठ विकेट आणि 17 चेंडू राखून हरवले. 


14 एप्रिल 2023 -सनरायजर्स हैदराबाद संघाने कोलकात्याला 23 धावांनी हरवले. 


18 एप्रिल 2023 - मुंबईने हैदराबादला 14 धावांनी पराभूत केले. 


21 एप्रिल 2023 - चेन्नईने हैदराबादला सात विकेटने पराभव केले.. 


24 एप्रिल 2023 -दिल्लीने हैदराबादचा सात धावांनी पराभव केला. हैदराबादचा हा पाचवा पराभव होता. सात सामन्यात हैदराबादला फक्त दोन सामने जिंकता आले. 


29 एप्रिल 2023 - हैदराबादने दिल्लीचा नऊ धावांनी पराभूत केले.. हैदराबादचा हा तिसरा विजय होता.


4 मे 2023 - कोलकात्याने हैदराबादचा पाच धावांनी पराभव केला. हैदराबादने हातात आलेला सामना गमावला.


7 मे 2023 - हैदराबादने राजस्थानचा चार विकेटने पराभव केला. हैदराबादचा हा चौथा विजय होता. 


13 मे 2023 - लखनौने हैदराबादचा सात विकेटने पराभव केला. 182 धावांचा बचाव करताना हैदराबादच्या गोंलदाजांनी भेदक मारा केला होता. पण मंकड, स्टॉयनिस आणि पूरन यांनी विजय खेचून आणला. 


15 मे 2023 - गुजरातचा हैदराबादवर विजय..    189 धावांचा पाठलाग करताना हैदराबादने पावरप्लेमध्येच सामना गमावला होता. 



हैदराबाद कुणाचे गणित बिघडवणार - 


मार्करमच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाचे आव्हान संपुष्टात आलेय. पण हैदराबाद संघाचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. ते इतर संघाचे प्लेऑफचे आव्हान संपवू शकतात.. किंवा गणित बिघडवू शकतात. हैदराबादचा संघ शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात उर्वरित सामने खेळेल.


18 मे   2023 - हैदराबादचा संघ आरसीबीबरोबर घरच्या मैदानात दोन हात करणार आहे. 


21 मे 2023 - वानखेडे मैदानावर हैदराबाद मुंबईसोबत दोन हात करणार आहे.  


मुंबई आणि आरसीबी यांच्यासाठी दोन्ही सामने निर्णायक आहेत. पण दुसरीकडे हैदराबादच्या संघाकडे गमावण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे ते बेधडक होऊन खेळतील.. त्यांच्यावर कोणतेही दडपण नसेल. अशा परिस्थितीत आरसीबी आणि  मुंबई यांच्यापुढे विजय मिळवण्याचे मोठे आव्हान असेल.