KL Rahul Ruled Out : टीम इंडियाला आणि लखनौ संघाला मोठा धक्का बसला आहे. केएल राहुल याची दुखापत गंभीर आहे. त्यामुळे उर्वरित आयपीएलमध्ये राहुल खेळताना दिसणार नाही. त्याशिवाय इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधूनही राहुल बाहेर पडलाय. केएल राहुल याने इन्स्टाग्राम पोस्ट करत दुखापतीची माहिती दिली आहे.

  


लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना केएल राहुल याला दुखापत झाली. राहुलची दुखापत गंभीर असल्याचे म्हटले जातेय. राहुल सध्या आराम करत आहे. आरसीबीविरोधात राहुल फलंदाजीसाठी मैदानात उतरला पण एकही धाव घेतली नाही. आता राहुल याने आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपमधून माघार घेतली आहे.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलला सुरुवात होणार आहे.  लंडनमधील ओव्हल मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकसमोर उभे असतील. ऑस्ट्रेलिया आणि भारताने आपल्या टीमची घोषणा केली आहे. काही खेळाडू इंग्लंडमध्ये सराव करत आहेत. तर काही खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. केएल राहुल दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला मुकणार आहे. केएल राहुल याने इन्स्टाग्राम पोस्ट करत दुखापतीची माहिती दिली.. पुढच्या महिन्यात टीम इंडियासोबत ओव्हलवर नसेल, त्यामुळे मी निराश आहे. देशासाठी खेळण्यासाठी मी सर्वकाही करेल.  ते नेहमीच माझे लक्ष आणि प्राधान्य राहिले आहे.


काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आणि वैद्यकीय सल्लामसलत केल्यानंतर, मांडीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसात शस्त्रक्रिया होईल. त्यानंतर फिटनेसवर लक्ष केंद्रित करेल. उर्वरित आयपीएल आणि पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये खेळू शकणार नाही. 






जयदेव उनादकटही दुखापतग्रस्त -


जयदेव उनादकट याने 12 वर्षांच्या कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन केले होते. बागंलादेशविरोधात त्याचे टीम इंडियात पुनरागमन झाले होते. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयनच्या संघात त्याची वर्णी लागली होती. पण आयपीएलमध्ये खेळताना जयदेवला दुखापत झाली आहे. लखनौ संघाकडून खेळणाऱ्या जयदेवला सरावारम्यान खांद्याला दुखापत झाली. जयदेवची दुखापत गंभीर असल्याचे बोलले जातेय. मुंबईत स्कॅन करण्यात आले आहे. बेंगलोरमध्ये एनसीएमध्ये जयदेव दुखापतीवर काम करत आहे. त्याचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपमध्ये खेळण्याची शक्यता कमीच वाटतेय. 


आणखी वाचा :


टीम इंडियाला दुखापतीचा फटका,  कोण WTC फायनलमधून बाहेर तर काहींच्या खेळण्यावर सस्पेन्स