IPL 2023 Gujarat Titans Squad Analysis Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाने आयपीएल जेतेपद जिंकत दणक्यात सुरुवात केली होती. यंदा आयपीएल विजेतेपद राखण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात उतरणार आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समतोल असणाऱ्या गुजरातचा पहिला सामना धोनीच्या चेन्नईविरोधात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिकच्या नेतृत्वातील गुजरात संघ कशी कमगिरी करतो, याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. पाहूयात या संघाची मजबूत आणि कमकुवत बाजू.... 


2023 साठी गुजरातचा संघ कसा आहे?


हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, राहुल तेवतिया, मोहम्‍मद शामी, शिवम मावी, यश दयाल, आर साई किशोर, अभिनव मनोहर, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), जयंत यादव, विजय शंकर, केएस भरत (विकेटकीपर), मोहित शर्मा, दर्शन नालकंडे, उर्विल पटेल, साई सुदर्शन, प्रदीप सांगवान, राशिद खान, डेविड मिलर, मॅथ्‍यू वेड (विकेटकीपर), अल्जारी जोसेफ, केन विलियमसन, जॉश लिटिल, ओडियन स्मिथ, नूर अहमद


खेळाडूंची उपलब्धता -


गुजरातच्या पिहल्या वहिल्या आयपीएल विजयात सिंहाचा वाटा उचलणारा डेविड मिलर यंदा पहिल्या सामन्याला मुकणार आहे. मिलर सध्या नेदरलँडविरोधात एकदिवसीय मालिका खेळत आहे. ही मालिका संपल्यानंतर मिलर तीन एप्रिल रोजी भारतात येणार आहे. पहिल्या सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल... चार एप्रिल रोजी दिल्लीविरोधात होणाऱ्या सामन्यापासून मिलर उपलब्ध असणार आहे. 


आयरलँडचा वेगवान गोलंदाज जोश लिटिल दुखापतीमुळे बांगलादेशविरोधात मालिकेला मुकला होता. हॅमस्ट्रिंगमुळे लिटिल संघाबाहेर होता. तो गुजरात संघासोबत जोडला जाणार आहे, पण त्याची दुखापत कितपत गंभीर आहे.. हे फिटनेस चाचणीनंतरच समजेल. मे महिन्याच्या दुसऱ्या आठड्यापासून दो मायदेशात परतणार आहे. त्यामुळे तो तेव्हापासून उपलब्ध नसेल. इतर सर्व खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील.


संभावित प्लेईंग XI -  


1 शुभमन गिल, 2 ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), 3 केन विल्यमसन, 4 हार्दिक पंड्या (कर्णधार), 5 मॅथ्‍यू वेड, 6 अभिनव मनोहर, 7 राहुल तेवतिया, 8 राशिद खान, 9 आर साई किशोर, 10 अल्‍ज़ारी जोसेफ, 11 मोहम्‍मद शामी


डेविड मिलर उपलब्ध झाल्यानंतर केन विल्यमसन याचे संघातील स्थान जाण्याची शक्यता आहे. मिलर आल्यानंतर मॅथ्यू वेड दुसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. तर मिलर पाचव्या क्रमांकावर खेळेल. 


यंदा गुजरातसाठी नवीन काय?


विल्यमसन, ओडियन स्मिथ आणि जोश लिटिल यंदा गुजरात संघासोबत जोडले आहे. या तिघांनी रहमानउल्‍लाह गुरबाज, डोमिनिक ड्रेक्‍स आणि लॉकी फर्ग्‍युसन यांची जागा घेतली आहे. त्याशिवाय केएस भरत आणि शिवम मावी यंदा गुजरात संघाकडून खेळणार आहे. 
 
गुजरातसाठी जमेची बाजू काय?
 
यंदाचा गुजरात संघ गेल्यावर्षीपेक्षा मजबूत दिसत आहे. हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाचा अनुभव आहे. त्याशिवाय तो आता अन स्विंग गोलंदाजीही करत आहे. त्याशिवाय शुभमन गिल सध्या लयीत आहे. राशिद खान याने नुकतेच दमदार कामगिरी केली आहे. पीसीएलमध्ये राशिद खान याने 11 सामन्यात 20 विकेट घेतल्या होत्या. त्याशिवाय डाव्या आणि उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंचे योग्य ते संतुलन आहे. हार्दिक आणि अन्य अष्टपैलू खेळाडूमध्ये संघ संतुलीत दिसत आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे.


संघासमोर प्रश्न काय ?


गुजरातचा संघ कागदावर मजबूत दिसतोय. पण संघाकडे सलामीची समस्या आहे. शुभमन गिलसोबत सलामीला कोण येणार? हा प्रश्न आहे. विल्यमसन, साहा हे पर्याय संघाकडे आहेत. त्याशिवाय मॅथ्‍यू वेडही सलमीला येऊ शकतो. सलामीला कोण येणार.. हा गुजरातपुढील सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याशिवाय शामीच्या जोडीला मावीला संधी मिळणार की इतर कुणाला? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.