South African Players, IPL 2023 : गुजरात आणि चेन्नईच्या सामन्याने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात दिमाखात झाली. प्रत्येक संघाचा एक एक सामना झाला आहे. काही संघाला विजय मिळला तर काही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकाचे संघाचे खेळाडू उपलब्ध नव्हते. नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे मालिका सुरु होती. आतंरराष्ट्रीय क्रिकेट असल्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने आयपीएलसाठी आपल्या खेळाडूंना रिलिज केले नव्हते. आता दक्षिण आफ्रिका संघाचे खेळाडू भारतात दाखल झाले आहेत. या यादीमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार एडन मार्करमसह इतर खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे दिल्ली, चेन्नई, गुजरात, लखनौ आणि पंजाब या संघाची ताकद आणखी वाढणार आहे.  


कोण कोणत्या संघाला दिलासा मिळाला ?


गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदाराबाद, चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स या संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकाचे खेळाडू भारतात दाखल झाले असून पुढील सामन्यासाठी उपलब्ध असतील. 


सनरायजर्स हैदराबाद- 


सनरायजर्स हैदराबाद संघाला सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, त्यांचा कर्णधार एडन मार्करम भारतात दाखल झाला आहे. मार्करमच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार याने सलामीच्या सामन्यात नेतृत्व केले होते. मार्करमशिवाय, मार्को जेनसन आणि हेनरिक क्लासेन हे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात दाखल झाले आहेत. हैदराबादच्या पुढील सामन्यासाठी हे तिन्ही खेळाडू उपलब्ध असतील.  


गुजरात टायटंस - 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने सलामीच्या सामन्यात विजय मिळवला. पण त्यांना फिनिशर डेविड मिलरची कमी जाणवली. आता डेविड मिलर भारतात दाखल झालाय. पुढील सामन्यासाठी तो उपलब्ध असेल.  मिलर याने गेल्यावर्षी गुजरातच्या विजयात मोलाची भूमिका साकारली होती.  17 सामन्यात मिलरने 481 धावा चोपल्या होत्या. 


पंजाब किंग्स - 


दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा पंजाबच्या संघासोबत जोडला गेलाय. रबाडा पंजाबचा प्रमुख वेगवान गोलंदाज होय. अर्शदीप, रबाडा आणि सॅम करन हे तीन खेळाडू पंजाबच्या गोलंदाजीची धुरा सांभाळतील.


लखनौ सुपर जायंट्स - 


दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्विंटन डि कॉक आयपीएल 2023 साठी भारतात दाखळ झाला आहे. पुढील सामन्यासाठी तो उपलब्ध असेल. गेल्यावर्षी डिकॉकने तुफानी फटकेबाजी केली होती. 


चेन्नई सुपर किंग्स -


वेगवान गोलंदाज सिसंदा मगाला चेन्नईच्या संघासोबत जोडला गेलाय. चेन्नईने कायल जेमीसनच्या जागी त्याला ताफ्यात घेतलेय. 


दिल्ली कॅपिटल्स - 
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गीडी आणि एनरिक नॉर्किया दिल्लीच्या ताफ्यात दाखल झाले आहेत