Indian Premier League 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात आरसीबीची कामगिरी सरासरी राहिली आहे. आरसीबीच्या आतापर्यंतच्या कामगिरीत चढ उतार दिसून आले.  आरसीबीने आतापर्यंत आठ सामन्यात चार विजय आणि चार पराभव स्विकारले आहेत. कोलकात्याने आरसीबीचा दोन वेळा पराभव केला, मध्यक्रम फ्लॉप झाल्यामुळेच आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. मध्यक्रम आणि लोअर ऑर्डरच्या फलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही, आरसीबीच्या पराभवाचे हे प्रमुख कारण आहे. 


आरसीबीची फलंदाजी पूर्णपणे केजीएफवर अवलंबून आहे. विराट कोहली, फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या तिघांचा अपवाद वगळता आरसीबीच्या एकाही फलंजाला मोठी खेळी करता आली नाही. कोहली, ग्लेन आणि फाफ यांना नेटकरी केजीएफ म्हणतात.. आरसीबीची फलंदाजी पूर्णपणे या तिघांच्या खांद्यावर आहे. हे तिन्ही फंलदाज बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव ढासळतो. जिंकत आलेल सामनाही आरसीबीने गमावला आहे. या तिघांचा अपवाद वगळता आरसीबीच्या एकाही फलंदाजाला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. 


फाफ डु प्लेसिस याने ४२२ धावांचा पाऊस पाडला आहे. सर्वाधिक धावा चोपणाऱ्या फंलदाजात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहलीने ३३३ धावा केल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेल याने २५८ धावा केल्या आहेत.  या तिघांनतर एकाही फलंजाला आतापर्यंत आठ सामन्यात १०० धावाही काढता आल्या नाहीत. केजीएफन आतापर्यंत ८० ते ९० टक्के धावांचे योगदान दिलेय. केजीएफनंतर सर्वाधिक धावा कार्तिकच्या आहेत. दिनेश कार्तिकने आतापर्यंत ८३ धावा केल्या आहेत. 



आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामना जिंकावाच लागणार आहे. आरसीबीचे होम ग्राऊंडवर फक्त एक सामना बाकी आहे. आता आरसीबीला प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्याच घरी जाऊन हरवायचे आहे.  आज लखनौविरोधात आरसीबी दोन हात करणार आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामना महत्वाचा आहे. केजीएफचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनाही धावा कराव्या लागतील. 


LSG vs RCB, IPL 2023 : लखनौ आणि बंगळुरुमध्ये लढत


लखनौ संघाने मागील सामन्यात पंजाब किंग्सवर विजय मिळवला. तर दुसरीकडे बंगळुरु संघाला मागील सामन्यात कोलकाताकडून पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. तर लखनौ सुपर जायंट्स संघ विजयी मोहित कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. लखनौ संघाने आतापर्यंत आठ पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर आरसीबी संघाने आठपैकी चार सामने जिंकले आहेत.


आणखी वाचा :