IPL 2023 Eliminator LSG vs MI : आयपीएल 2023 मधील एलिमिनेटर सामना आज, 23 मे रोजी मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील सध्या शेवटचा टप्पा सुरु आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लखनौ आणि मुंबई यांच्यातील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या दोन संघामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले असून त्यात लखनौने तिन्ही जिंकले आहेत.


मुंबईला लखनौविरोधात विजय मिळणार? 


गेल्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यातील आकडेवारी पाहता, आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईचा संघ लखनौवर मात करू शकेल, असा शक्यता आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला मागील हंगामात म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये आरसीबीविरुद्ध खेळवण्यात आलेल्या एलिमिनेटर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. लखनौच्या एलिमिनेटरची ही आकडा पाहता मुंबई आजच्या सामन्यात विजय मिळवण्याची शक्यता आहे.


कोण-कोणावर भारी? पाहा आकडेवारी काय सांगते? 


पण, असं असलं तरी इंडियन प्रीमियर लीगची आकडेवारी पाहता लखनौ सुपर जायंट्स संघाचं पारड जड दिसून येत आहेत. आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघ आतापर्यंत तीन वेळा आमने-सामने आले आहेत. या तीन सामन्यांमध्ये लखनौनं मुंबईला धोबीपछाड दिला आहे. लखनौ विरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. यंदाच्या मोसमातील यापूर्वीच्या सामन्यातही लखनौनं मुंबईचा पराभव केला होता.


सामना जिंकणाऱ्या संघाचा सामना क्वालिफायर 2 गुजरातविरुद्ध 


मुंबई आणि लखनौ यांच्यात होणार्‍या एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघ 26 मे रोजी, शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. आता गुजरात टायटन्स संघाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


एलिमिनेटरपर्यंत पोहोचलेल्या संघांची आकडेवारी काय सांगते?


आयपीएलच्या इतिहासात एलिमिनेटरपर्यंत पोहोचलेल्या संघांचा विक्रम खूपच खराब राहिला आहे. आतापर्यंत झालेल्या 15 मोसमात, एलिमिनेटर सामना खेळणाऱ्या संघाला एकदाच विजेतेपद पटकावता आलं आहे. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2016 मध्ये एलिमिनेटर सामना जिंकून त्यानंतर विजेतेपद मिळवलं होतं. 


आयपीएल 2016 मध्ये, सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होता. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने एलिमिनेटरमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या कोलकाताचा 22 धावांनी पराभव केला. यानंतर हैदराबादने क्वालिफायर 2 मध्ये गुजरात लायन्स विरुद्धचा सामना 4 गडी राखून जिंकला. त्यानंतर अंतिम फेरीत हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावलं मिळवला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


MI vs LSG Playing 11 : मुंबईच्या 'पलटन' समोर लखनौचं 'सुपर' आव्हान, कशी असेल रोहित अन् कृणालची प्लेईंग 11