Delhi Capitals David Warner : दिल्लीच्या खेळाडूंचे चोरीला गेलेले सामान पोलिसांनी परत मिळवले आहे. आरसीबीविरोधात बेंगलोर येथे झालेल्या सामन्यानंतर दिल्लीच्या खेळाडूंचे सामान चोरीले गेले होते. त्यामध्ये बॅटसह इतर क्रिकेटच्या साहित्यांचा समावेश होता. पोलिसांनी दोन दिवसात चोरीचे सामान परत मिळवलेय. दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत खेळाडूंचे सामान परत मिळाल्याची माहिती दिली आहे.  आरोपीला पकडण्यात आले आहे. चोरीला गेलेले बरेचसे सामान परत मिळाल्याचे वॉर्नरने स्टोरीमधून सांगितलेय. 


डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, सॉल्ट याच्यासह अन्य क्रिकेटरच्या बॅट चोरीला गेल्या होत्या. बेंगलोरवरुन दिल्लीचा संघ दिल्लीमध्ये पोहचल्यानंतर त्याला चोरी झाल्याचे समजले होते. त्यानंतर पोलिसांत याबाबत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सामान परत मिळवलेय. 


कोणत्या खेळाडूंचे क्रिकेट सामान चोरीला गेले होते ?


यश धुल- 5 बॅट, थायपॅड, ग्लोव्हज
डेविड वॉर्नर- 1 बॅट, हेल्मेट आणि अन्य सामान
मिचेल मार्श- 2 बॅट आणि थायपॅड
रिपल पटेल- 1 बॅट
विकी- 1 बॅट, ग्लोव्हज, 2 सन ग्लासेज
अभिषेक पोरल- 3 बॅट थायपॅड, हेल्मेट आणि ग्लोव्हज 2 पीस 






दिल्लीने विजयाचे खाते उघडले -


अटीतटीच्या लढतीत दिल्लीने कोलकात्याचा चार विकेटने विजय मिळवला. 127 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची तारांबळ उडाली होती. डेविड वॉर्नरचे अर्घशतक वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अक्षर पटेल याने अखेरच्या षटकात निर्णायक फलंदाजी केल्यामुळे दिल्लीचा विजय झाला. दिल्लीने चार विकेट आणि चार चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील दिल्लीचा हा पहिला विजय होय. लागोपाठ पाच पराभवानंतर दिल्लीने पहिला विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलेय. 


कोलकात्याने दिलेले 128 धावांचे आव्हान पार करताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला. पृथ्वी शॉ याला १३ धावांवर वरुण चक्रवर्तीने तंबूत धाडले. त्यानंतर मिचेल मार्श आणि सॉल्टही एकापाठोपाठ एक तंबूत परतले. मिचेल मार्श दोन तर सॉल्ट पाच धावा काढून बाद झाले. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला डेविड वॉर्नर संयमी फलंदाजी करत होता. पण वरुण चक्रवर्ती याने डेविड वॉर्नर याला तंबूत पाठवले. वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. वॉर्नरने ४१ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ११ चौकार लगावले. वॉर्नर बाद झाल्यानंतर मनिष फांडे आणि अक्षर पटेल यांनी डाव सांभाळला. मनिष पांडे २१ धावांवर बाद झाला. त्यानंतरअमन खान गोल्डन डकचा शिकार झाला. त्यानंतर अक्षर पटेल याने ललीत यादव याला जोडीला घेत दिल्लीला विजय मिळवून दिला. धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी एकही षटकार लगावला नाही.