CSK in IPL 2023 : सेलिब्रिटी जितके चर्चेत असतात तितकीच चर्चा त्यांच्या मुलांचीही होते. कलाकार मंडळींप्रमाणंच खेळाडूंची मुलंही यात मागे नाहीत. खेळाडूंच्या मुलांची नावं सांगायची झाल्यास त्यात (Ms Dhoni) महेंद्र सिंह धोनी याच्या मुलीचं नाव अग्रस्थानी येतं असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर डिझायनंर कपडे घालून अनोख्या अंदाजात नेटकऱ्यांची मनं जिंकणं असो, किंवा मग एखाद्या व्हिडीओतून माहिलाही टक्कर देणं असो, झिवा कायमच लक्ष वेधते.   चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि झिवा यांचा फोटो सध्या चर्चेचा विषय आहे.  


चेन्नईने  सोशल मीडियावर धोनी आणि झिवा यांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोघेही मैदानात आहे. या फोटोची सध्या चर्चा सुरु आहे. दोन दिवसाखाली अजिंक्य रहाणे आणि त्याच्या मुलाचा फोटोही चेन्नईने पोस्ट केला होता. आज धोनी आणि मुलाचा फोटो पोस्ट केलाय. या फोटोशिवाय चेन्नईने आपल्या इन्स्टाग्रामवर खेळाडूंच्या मुला-मुलीचा खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये धोनीची मुलीचाही समावेश आहे. रॉबिन उथप्पा आणि धोनीही या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा आहे.  










चेन्नईची दमदार कामगिरी - 


एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघ सध्या दमदार फॉर्मात आहे. चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा चेन्नईने दमदार कामगिरी केली असून प्लेऑफच्या दिशेने पाऊला टाकलेय. 13 गुणांसह चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने आतापर्यंत 11 सामन्यात सहा विजय मिळवल आहेत. त्याशिवाय एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. चेन्नईचे सध्या 13 गुण आहेत. चेन्नईचे आणखी तीन सामने शिल्लक आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी चेन्नईला प्रत्येक सामन्यात विजय अनिवार्य आहे. चेन्नईने मागील पाच सामन्यात दोन विजय आणि दोन पराभव स्वीकारलेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झालाय. ऋतुराज गायकवाड, डेवेन कॉनवे, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा आणि तुषार देशपांडे सध्या भन्नाट फॉर्मात आहेत.