IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये आज लढत होणार आहे. बुधवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) हा सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. चेन्नई आणि राजस्थान दोन्ही संघांचा हा चौथा सामना असेल. (IPL 2023 Match 15 RR vs CSK). यंदाच्या मोसमात चेन्नईचा घरच्या मैदानावर हा दुसरा सामना अले. चेपॉक स्टेडिअमवरील लखनौ विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा विजयी झाला होता.  आजच्या या सामन्यात पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल...


1 महेंद्र सिंह धोनी


चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या कामगिरकडे सर्वांचे लक्ष असेल. आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात धोनीने दमदार प्रदर्शन केलेय. धोनीकडून आजही फिनिशिंगची आपेक्षा आहे. लखनौविरोधात धोनीने लागोपाठ दोन षटकार मारले होते. 


2 बेन स्टोक्स


चेन्नईने बेन स्टोक्स याला 16.25 कोटी रुपयांच्या किंमतीमध्ये ताफ्यात घेतले होते. पण आतापर्यंत स्टोक्सला चांगली कामगिरी करता आली नाही. दोन सामन्यात तो फ्लॉप राहिल तर एका सामन्यात दुखापतीमुळे बाहेर होता. दोन सामन्यात त्याला फक्त पंधरा धावा करता आल्या. गोलंदाजीत त्याला यश मिळाले नाही. 


3 संजू सॅमसन


राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याचे प्रदर्शन आतापर्यंत दमदार राहिलेय. आतापर्यंत तीन सामन्यात त्याने ९७ धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. आज संजूकडून मोठ्या खेळीची आपेक्षा आहे. 


4 ऋतुराज गायकवाड


चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या तुफान फॉर्मात आह. त्याने आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत. पहिल्या सामन्यात 92, दुसऱ्या सामन्यात 57 आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद  40 धावा केल्या होत्या. आज तो कशी फलंदाजी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. 


5 यशस्वी जायस्वाल 
राजस्थान रॉय्लसचा युवा सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल याने आतापर्यंत आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधलेय. जोस बटलरसोबत तो धावांचा पाऊस पाडताना दिसतोय. 
 तीन सामन्यात त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत.
 


MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?


चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.