Ruturaj Gaikwad in IPL 2023 : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक फलंदाजी करत सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक फलंदाजी केली होती. गुजरातविरोधात ऋतुराजने 92 धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर आज लखनौविरोधात त्याने अर्धशतकी खेळी केली. प्रत्येक हंगामानंतर ऋतुराज गायकवाड याची फलंदाजी अधिक निखारत असल्याचे दिसतेय.
लखनौच्या गोलंदाजांचा समाचार -
नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईकडून कॉनवे आणि ऋतुराज सलामीसाठी मैदानात उतरले. दोघांनी चेन्नईला आक्रमक सुरुवात करुन दिली. ऋतुराज गायकवाड याने मैदानाच्या चारीबाजून फटकेबाजी केली. ऋतुराज गायकवाड याने 31 चेंडूत 57 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत ऋतुराज गायकवाड याने 4 षटकार आणि तीन चौकार लगावले. रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर ऋतुराजची खेळी संपुष्टात आली. ऋतुराज गायकवाड याने कॉनवेसोबत 9 षटकात 110 धावांची सलामी दिली. ऋतुराजसमोर लखनौची गोलंदाजी दुबळी जाणवत होती.
गुजरातलाही धुतले -
सलामीच्या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने धावांचा पाऊस पाडला होता. अवघ्या आठ धावांमुळे ऋतुराज गायकवाडचे शतक हुकले. अल्जारी जोसेफ याने ऋतुराज गायकवाड याला 92 धावांवर बाद केले. ऋतुराज गायकवाड याने 50 चेंडूत 92 धावांच खेळी केली. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने ऋतुराज गायकवाड याने चौकार षटकारांचा पाऊस पाडला. ऋतुराज गायकवाडपुढे गुजरातचा प्रत्येक गोलंदाजाने गुडघे टेकले होते. ऋतुराज गायकवाडने चोहोबाजूने धावा चोपल्या. ऋतुराज गायकवाडने 9 षटकार आणि 4 चौकारांचा पाऊस पाडला.
षटकारांचा पाऊस -
टीम इंडियात सलामी फलंदाजाच्या शर्यतीत असणाऱ्या ऋतुराज गायकवाड याने आयपीएलमधील पहिल्या दोन्ही सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. देशांतर्गत क्रिकेटमध्येही ऋतुराज गायकवाड याने धावांचा पाऊस पाडलाय. आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या सुरुवातीलाच ऋतुराज गायकवाड याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ऋतुराज गायकवाड याने आतापर्यंत 7 चौकार आणि 13 षटकार लगावले आहेत.
आणखी वाचा :
IPL : चेन्नई, गुजरात, दिल्ली अन् पंजाबची ताकद वाढणार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात दाखल
IPL 2023 : केकेआरला मोठा झटका, शाकिब अल हसन आयपीएलमधून 'आऊट'