IPL 2023, CSK Pretorious and Gaikwad Perfect Team Work : आयपीएल 2023 मध्ये मुंबईच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) सात विकेट्सने दमदार विजय मिळवला. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर हा रोमांचक सामना पाहायला मिळाला. चेन्नईच्या गोलंदाजांच्या जाळ्यात मुंबई इंडियन्सचे फलंदाज चांगलेच अडकले. या सामन्यात चेन्नई संघाची उत्तम गोलंदाजी आणि फिल्डींग पाहायला मिळाली. या सामन्यात खेळाडूंनी काही उत्तम झेल पकडले. यामध्ये ट्रिस्टन स्टॅब्स च्या कॅचचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.


प्रिटोरियसने घेतलेला झेल ऋतुराजने सावरला!


चेन्नईच्या ड्वेन प्रिटोरियस आणि ऋतुराज गायकवाड यांनी मिळून कमालीचा झेल घेत मुंबई इंडियन्सच्या ट्रिस्टन स्टब्सला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. या कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाऊंड्री लाईनवर पकडलेल्या या अप्रतिम कॅचची सर्वत्र चर्चा होत आहे. ड्वेन प्रिटोरियस आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी हा झेल घेत उत्तम टीम वर्क दाखवलं.


पाहा व्हिडीओ : कमाल कॅचची चर्चा, बाऊंड्री लाईनवरील 14 सेकंदाचा Video व्हायरल






ट्रिस्टन स्ट्रब्सचा झेल ऋतुराज गायकवाडने पकडला पण, यामध्ये ड्वेन प्रिटोरियसचा मोठा वाटा होता. मुंबई इंडियन्स डावातील 16 वं षटक सुरु होतं. पाच धावांसह ट्रिस्टन स्टब्स फलंदाजी करत होता. सिसांडा मगलाच्या फुल लेन्थ स्लो बॉलवर ट्रिस्टनने एरियल शॉट खेळला. हा चेंडू लाँग ऑफ बाऊंड्री पलीकडे जाईल असे वाटत होते. पण बाऊंड्री लाईनवर असणाऱ्या प्रिटोरियस झेल घेतला. पण झेल घेतल्यानंतर प्रिटोरियसचा तोल गेला आणि तो बाऊंड्री लाईनच्या पलिकडे पडला. मात्र, बाऊंड्रीच्या पलिकडे पडण्याआधी प्रिटोरियसने चेंडू हवेत फेकला आणि या चेंडू जवळच असलेल्या ऋतुराज गायकवाडने झेलला आणि यामुळे मुंबईच्या ट्रिस्टन स्टब्सला तंबूत परतावं लागलं.


सीमारेषा पलिकडे पडण्यापूर्वी प्रिटोरियसने चलाखीने चेंडू गायकवाडकडे टोलवला आणि त्याने तो उत्तम प्रकारे झेलला. मगालाची आयपीएलमधील ही पहिली विकेट होती. प्रिटोरियस आणि गायकवाड यांच्या या कॅचचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. दोन खेळाडूंनी मिळून झेल घेत स्टब्सला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : 'दुर्दैवी विकेट्स आणि भागीदारीचा अभाव'; मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, प्रशिक्षक मार्क बाऊचरनं सांगितलं खरं कारण