Suresh Raina on CSK won on MI : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) दमदार विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मुंबईच्या घरच्या मैदानावर पराभव केला. चेन्नईने (CSK) मुंबईवर (MI) सात विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा पराभव असून मुंबईला (MI) अजून खातंही उघडता आलेलं नाही. शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. दरम्यान, चेन्नईच्या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाची माजी खेळाडू सुरेश रैना याने प्रतिक्रिया दिली आहे.


MI vs CSK : चेन्नईचा मुंबईत धमाका!


चेन्नई सुपर किंग्सने सामन्यानंतर सुरेश रैनाचा (Suresh Raine) एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरेश रैनाने मुंबई आणि चेन्नई यांच्यातील अटीतटीच्या लढतीबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, आता चेन्नई संघाला चेन्नईमध्ये सामना जिंकताना पाहायला आवडेल. चेन्नई सुपर किंग्सने मुंबईच्या मैदानावर चांगली खेळी केली. आता आयपीएल स्पर्धा रोमांचक वळणावर आहे. अजिंक्य राहणेनं आज चांगली अर्धशतकी खेळी केली. रविंद्र जडेजाने चांगला झेल घेतला. धोनीनंही दमदार षटकार ठोकले. चेन्नईचा खेळ उत्तम होता.'


पाहा व्हिडीओ : सुरेश रैना काय म्हणाला?






सुरेश रैनाने सप्टेंबर 2022 मध्ये आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. रैना याआधी IPL 2021 मध्ये खेळताना दिसला होता. त्यावेळी त्याने 12 सामन्यांमध्ये 17.77 च्या सरासरीने 160 धावा केल्या. आयपीएल 2021 मध्ये त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. 2021 च्या हंगामातील खराब फॉर्मनंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने त्याला कायम ठेवलं नाही. आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मेगा लिलावात त्याची मूळ किंमत 2 कोटी होती. मात्र त्याला कोणत्याही संघानं विकत घेतलं नाही.


त्यानंतर, सुरेश रैना आयपीएलच्या 2022 हंगामात होस्ट ब्रॉडकास्टरमध्ये तज्ज्ञ आणि कॉमेंट्री करताना दिसला. यंदाच्या आयपीएल 2023 मध्येही सुरेश रैना तज्ज्ञ आणि कॉमेंटेटर म्हणून दिसत आहे. सुरेश रैना यंदा आयपीएल खेळत नसला तरी, त्याची चेन्नई सुपर किंग्स संघाशी असलेली नाळ तुटलेली नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Points Table : चेन्नईच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये उडी, गुणतालिकेची स्थिती काय?