CSK vs GT, IPL 2023 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या ग्रँड फिनालेला सुरुवात होण्यापूर्वी स्पर्धेच्या सांगता समारंभाकडे (IPL Closing Ceremony) सर्वांचे लक्ष असेल. 28 मे रोजी होणार्‍या चेन्नई आणि गुजरात (GT vs CSK) यांच्यातील बहुप्रतिक्षित सामन्याने आयपीएल क्रिकेट हंगामाचा शेवट होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) आधीच समारोप समारंभासाठी सज्ज झालं आहे. अनेक नामवंत कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. बॉलीवूड स्टार रणवीर सिंह आणि प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान यांचीही हजेरी लागण्याची शक्यता आहे.


आयपीएल 2023 चा अंतिम सामना


बहुचर्चित आयपीएल 2023 (IPL 2023) चा आज समारोप होणार आहे. धूमधडाक्यात यंदाच्या हंगामाचा सांगता सोहळा पार पडणार आहे. 28 मे रोजी आयपीएल 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना गुजरात आणि चेन्नई यांच्यात रंगणार आहे. सामन्याआधी आयपीएलचा समारोप सोहळा पार पडेल. संध्याकाळी 6:00 वाजेपासून हा सोहळा सुरू होण्याची शक्यता आहे. याची अधिकृत वेळ समोर आलेली नाही. आयपीएल 2023 च्या उद्घाटन समारंभाला (IPL Opening Ceremony 2023) अरिजित सिंह, रश्मिका मंदान्ना आणि तमन्ना भाटिया यांसारख्या स्टार्सनं हजेरी लावली होती. आज आयपीएलच्या सांगता समारंभही अनेक दिग्गज स्टार्स सामील होणार आहेत.


'या' सेलिब्रिटींचं दमदार परफॉर्मन्स पाहता येणार


आजच्या आयपीएलच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. भारतीय रॅपर डिव्हाईन, गायक किंग आणि इतर कलाकार या समारोप समारंभात परफॉर्मन्स करणार आहेत. गायक जोनिता गांधी आणि न्यूक्लिया या सोहळ्याला हजेरी लागणार आहे. यासोबतच बॉलिवूड स्टार रणवीर सिंह आणि संगीतकार ए.आर. रहमान हेही या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवण्याची शक्यता आहे.


रणवीर सिंह, ए.आर. रहमानही उपस्थित राहण्याची शक्यता


दरम्यान, रणवीर आणि ए.आर रहमान याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


IPL Final 2023 :  कधी आणि कुठे रंगणार अंतिम सामना?


आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीचा रणसंग्राम आज, 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : 59 दिवस आणि 74 सामने; आज ठरणार महाविजेता, चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष