IPL 2023 Final : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) यंदाच्या सोळाव्या मोसमात फक्त एकमेव सामना शिल्लक आहे. आयपीएल 2023 चा हा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील हा 74 वा सामना असेल. 31 मार्च रोजी धूमधडाक्यात या स्पर्धेला सुरुवात झाली. 59 दिवस आणि 73 सामन्यानंतर आज आयपीएल 2023 मधील विजेता मिळणार आहे. चार वेळा विजेता चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गतविजेता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ आज रणसंग्रामासाठी सज्ज झाले आहेत. 


चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स अंतिम सामना


विशेष म्हणजे यंदाच्या मोसमाची सुरुवात 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढतीने झाली. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा सलामी सामन्यातील दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यातच गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सचा पाच गडी राखून पराभव केला होता. आजच्या सामन्यात चेन्नई पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाला आहे. तर गतविजेता गुजरात संघ दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या तयारीत आहे.


चेन्नईला मुंबईच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी


आयपीएलच्या इतिहासातील रंजक आकडेवारीनुसार, पहिल्या सामन्यात सामील संघाने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं असं पाच वेळा घडलं आहे. तर, आयपीएल पहिला सामना जिंकणारा संघच विजेता बनण्यात यशस्वी ठरल्याचं आतापर्यंत तीन वेळा घडलं आहे. दोन वेळा पहिला सामना हरलेला संघ विजेता ठरला आहे. मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे जो दोनदा सलामीचा सामना गमावूनही विजयी ठरला. मुंबई इंडियन्सने विक्रमी पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. तर चेन्नई सुपर किंग्स चार वेळा चॅम्पियन ठरला असून संघाला यंदा मुंबईच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.


IPL Final 2023 :  कधी आणि कुठे रंगणार अंतिम सामना?


आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीचा रणसंग्राम आज, 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


आज धुमधडाक्यात होणार IPL 2023 ची सांगता, सोहळ्याला 'या' सेलिब्रिटींची मांदियाळी, जाणून घ्या कोण-कोणते स्टार्स लावणार हजेरी