MI vs CSK, IPL 2023 : एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षानंतर वानखेडेवर मुंबईचा संघ फलंदाजीसाठी उतरणार आहे. मुंबई आणि चेन्नई या सामन्याकडे क्रीडा जगताचे लक्ष लागलेय. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे. तर अजिंक्य राहणे याने चेन्नईकडून पदार्पण केलेय.  मुंबई आणि चेन्नई यांच्यातील हा सामना खास आहे, कारण हा आयपीएलमधील एक हजारावर सामना आहेय. दव पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे धावांचा पाठलाग करताना फायदा होऊ शकते, हे पाहून धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 


चेन्नई आणि मुंबई संघामध्ये काही बदल करण्यात आले आहे. मुंबईकडून जोफ्रा आर्चर याला बाहेर बसवण्यात आले आहे. जोफ्रा आर्चर सराव करताना दुखापतग्रस्त झाला होता. तर चेन्नईकडून मोईन अली आणि बेन स्टोक्स यासारख्या दिग्गजांना बाहेर बसवलेय. मोईन अली आजारी असल्यामुळे प्लेईंग 11 चा भाग नाही. चेन्नईकडून मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याने पदार्पण केलेय. 


दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे.... दोन्ही संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. 


मुंबई इंडियन्स –


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमरुन ग्रीन, तिलक वर्मा, टिम डेविड, ट्रिस्टान स्टब्स, ऋतिक शौकीन, पीयूष चावला, जेसन बेहरनडॉर्फ, अरशद खान.


चेन्नई सुपर किंग्स – 


डेवॉन कानवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चाहर, मिचेल सँटनर, सिसांदा मगाला, तुषार देशपांडे. 






घरच्या मैदानावर दोन वर्षानंतर घरवापसी करत मुंबई इंडियन्स पहिला विजय मिळवून यंदाच्या मोसमात खातं उघडण्याचा प्रयत्न करेल.  वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 चा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही असाच प्रकार घडला आहे. येथील सपाट विकेटवर गोलंदाजांना विशेष मदत मिळत नाही. येथील सीमा लहान आहेत आणि आऊटफिल्ड खूप वेगवान आहे.


कोण बाजी मारणार ?
आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2023 मध्ये एक सामना खेळला असून, त्यात त्यांचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव झाला आहे. दुसरीकडे, दोन सामने खेळलेल्या लखनौ सुपर जायंट्सने एक सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे.