Indian Premier League 2022 : दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकणाऱ्या दिल्ली संघात तीन बदल करण्यात आले. यामध्ये सर्वातम मोठा बदल म्हणजे सलामी फलंदाज पृथ्वी शॉ याला प्लेईंग 11 मधून बाहेर बसवलेय. दिल्लीला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, यामध्ये पृथ्वी शॉ याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. लखनौविरोधात 12 तर गुजरातविरोधात सात धावांची खेळी केली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातून पृथ्वी शॉ याला डच्चू दिला आहे. पृथ्वी शॉ याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्यात आले आहे.
डेविड वॉर्नर याने पृथ्वी शॉ याला इम्पॅक्ट प्लेअरच्या यादीत टाकले आहे. पृथ्वी शॉ फलंदाजीसाठी येणार की.. आज दिल्लीची नवी सलामी जोडी दिसणार.. याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. पृथ्वी शॉ याच्याशिवाय दिल्लीच्या संघात आणखी दोन बदल करण्यात आले आहे. सरफराज खान यालाही प्लेईंग 11 मधून बाहेर बसवलेय. त्याशिवाय मिचेल मार्श लग्न असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. पृथ्वी शॉ याच्याशइवाय सरफराज खान यालाही इम्पॅक्ट प्लेअरच्या यादीत टाकलेय. पृथ्वी शॉ याच्याप्रमाणे सरफराजलाही मोठी खेळी करता आली नाही. सरफराजने पहिल्या सामन्यात 4 तर दुसऱ्या सामन्यात 30 धावांची खेळी केली होती.
Delhi Capitals Team: दिल्ली संघात तीन बदल -
डेविड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, राइली रुसो, रोवमन पॉवेल, ललित यादव, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, ऑनरिख नॉर्खिया, मुकेश कुमार, खलील अहमद
राजस्थानने देवदत्तला दिला धक्का -
राजस्थान संघातही महत्वाचे दोन बदल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे देवदत्त पडिक्कल याला प्लेईंग 11 मधून बाहेर बसवलेय. त्याच्या जागी युवा ध्रुव जुरेल याला स्थान दिलेय. तर गोलंदाजीत के आसिफ याच्या जागी संदीप शर्मा याला स्थान दिलेय.
राजस्थानचे 11 रॉयल कोण आहेत?
जॉस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रवि अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, संदीप शर्मा