IPL 2023, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात सोमवारी सामना होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) 3 एप्रिल रोजी इंडियन प्रीमियर लीगमधील सहावा सामना पार पडणार आहे. चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघाचा हा दुसरा सामना आहे. आयपीएल 2023 च्या सलामी सामन्यात चेन्नईला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता धोनीच्या (Dhoni) चेन्नई संघाचं लखनौ विरोधातील सामन्यात मोसमातील पहिला विजय मिळविण्याचं लक्ष्य असेल. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स संघाने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सवर 50 धावांनी दणदणीत विजय मिळवला. चेन्नईसोबतच्या मासन्या लखनौ आपला विजयी पॅटर्न कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. 


CSK vs LSG Head-To-Head : हेड टू हेड


आयपीएलच्या गेल्या मोसमात दोन्ही संघ एकदाच आमनेसामने आले होते. आयपीएल 2022 मध्ये लखनौने सीएसकेचा पराभव करत सहा गडी राखून विजयी झाला. हा सामना IPL 2022 दरम्यान मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यामध्ये फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं.


LSG vs CSK, IPL 2023 : कुणाचं पारड जड?


घरच्या मैदानावर सामना होणार असल्यान चेन्नई आणि धोनीसाठी हा एक भावनिक अनुभव असेल. चेपॉक स्टेडिअमवर धोनीच्या अनेक आठवणी आहेत. दुसरीकडे, केएल राहुल विजयाच्या मानसिकतेसह चेन्नईला तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांची फलंदाजी साधारणत: सारखी आहे. तर गोलंदाजीबाबत बोलायचं झालं तर, लखनौचा मार्क वूड याने आयपीएल 2023 च्या पंजाब विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. तसेच पराभव झालेल्या चेन्नई संघातून पदार्पण करणाऱ्या राजवर्धन हंगरगेकर यानंही पहिल्याच सामन्यात तीन गडी बाद केले होते.


CSK Playing 11 : चेन्नई संभाव्य प्लेईंग 11


डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगरगेकर


LSG Playing 11 : लखनौ संभाव्य प्लेईंग 11


केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन (विकेटकिपर), कृणाल पंड्या, आयुष बडोनी, आवेश खान, मार्क वुड, रवी बिश्नोई, डॅनियल सन्स


महत्त्वाच्या इतर बातम्या :


CSK vs LSG Match Preview : चेन्नईचं खातं उघडणार की लखनौ बाजी मारणार? धोनी विरुद्ध केएल राहुल मैदानात; खेळपट्टी कशी असेल?