Sachin Tendulkar Prank on Ganguly : मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा ( Sachin Tendulkar ) 24 एप्रिलला 50 वा वाढदिवस आहे. सचिनच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी डायमंड ज्वेलरीचा विश्वासू ब्रँड तनिष्कने सचिनने मास्टर-ब्लास्टरला समर्पित सेलेस्टियल नावाचं लिमिटेड कलेक्शन लाँच केलं आहे. सचिनच्या 100 व्या शतकी खेळीच्या पार्श्‍वभूमीवर लाँच करण्यात आलेल्या ज्वेलरी स्पेशल एडिशनमध्ये फक्त 100 अंगठ्या असणार आहेत. लाँच इव्हेंट दरम्यान, सचिनने त्याच्या मनोरंजक क्रिकेट प्रवासावर प्रकाश टाकला. 1983 च्या विश्वचषकाच्या विजयापासून प्रेरणा घेऊन, आयुष्यभर कठोर परिश्रम करून सचिननं विक्रमी कामगिरी केली.


सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ


सचिन तेंडुलकरने यावेळी एक गंमतीशीर किस्सा सांगितला. अनुभवी क्रिकेटपटू मैदानावर आणि मैदानाबाहेर एकमेकांशी चांगले संबंध ठेवतात आणि ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण पाहायला मिळतं. ते एकमेकांच्या खोड्याही काढतात. सचिनसह इतरांनी सौरव गांगुलीला ( Saurav Ganguly ) एकदा एप्रिल फूल ( April Fool Prank ) बनवायचं ठरवलं. सचिन आणि हरभजन सिंह  ( Sachin Tendulkar )यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्यासाठीही तयार झाला होता.


मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा 


सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंगने  ( Harbhajan Singh ) गांगुलीवर एप्रिल फूलची प्रँक करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सौरव गांगुलीच्या कारकिर्दीतील खराब काळ सुरु होता. तो चांगला स्कोअर करू शकला नाही. सचिन आणि हरभजनने प्रशिक्षक डॉन राइट आणि इतर स्टाफला ड्रेसिंग रूमबाहेर पाठवलं. आणि एक बनावट वर्तमानपत्र घेऊन गांगुलीसमोर आले. त्यांनी एक बनावट वृत्तपत्र छापून आलं ज्यात असं म्हटलं होतं की सौरव गांगुली नाखूष आहे आणि त्याने संघातील प्रत्येक खेळाडूला फटकारलं आहे. 


पुढे काय घडलं?


त्यानंतर, जेव्हा त्याने ड्रेसिंग रूममध्ये पाऊल ठेवलं तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहू लागलं आणि वृत्तपत्रातील बातमीबद्दल विचारू लागले. हे नाटक काही काळ चाललं. नंतर गांगुली म्हणू लागला की, मी देवाची शपथ घेतो की मी संघाविरुद्ध कधीच काही बोललो नाही. तेव्हा आम्ही म्हटलं की आम्ही सर्व एकाच टीमचा भाग आहोत. आणि तुम्ही बाहेर जाऊन अशी टीका कशी करू शकता?. दादांना (गांगुली) कळलेच नाही की तो एप्रिल फूल होता. तेव्हा गांगुली म्हणाला की, मी कणर्धारपद सोडायला तयार आहे. दरम्यान टीममधील काही खेळाडूंना हसू आवरता आलं नाही. त्यामुळे हे सगळे गंमत करत असल्याचं गांगुलीला कळालं.