IPL 2023: मुंबई इडियन्सचा (Mumbai Indians) प्रमुख खेळाडू कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) मंगळवारी (15 नोव्हेंबर) आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या रिटेन्शनआधीच त्यानं आपल्या 13 वर्षाच्या आयपीएल कारकिर्दिला पूर्णविराम लावला. पोलार्डचा हा निर्णय अनेकांना धक्का देणारा होता. दरम्यान, अनेक दिग्गज खेळाडू पोलार्डला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतायेत. यातच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंही (Rohit Sharma) पोलार्डसाठी एक इमोशनल पोस्ट केलीय.


रोहित शर्मानं आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर पोलार्डसोबतचा खास फोटो शेअर करत इमोनशल पोस्ट केली. "मोठा माणूस, मोठा प्रभाव आणि नेहमीच मनापासून खेळणारा. मुंबई इंडियन्सचा खरा लीजेंड्स", असं रोहित शर्मानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय. रोहित शर्माची ही इमोशनल पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. याशिवाय, मुंबई इंडियन्सचे चाहते पोलार्डच्या योगदानाबद्दल त्याचं धन्यवाद करत आहेत. 


रोहित शर्माची इन्स्टाग्राम पोस्ट-






 


पोलार्ड प्रशिक्षकाच्या भूमिकेत
आयपीएलमध्ये 100 पेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या काही मोजक्याच खेळाडूंपैकी एक असलेल्या कायरन पोलार्डनं 2010 आयपीएलचा पहिला सामना खेळला होता. त्याच्यानंतर तब्बल 13 वर्षानंतर मुंबई इंडियन्सनं त्याच्याशी संबंध संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, यापूर्वीच पोलार्डनं आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. खेळाडू म्हणून मुंबई सोबतचा प्रवास संपला असला तरी, आता पुढील हंगामापासून तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. इथेही अशाच प्रकारचे यश मिळवण्याचा त्याचा मानस असेल.


पोलार्डची आयपीएल कारकीर्द
पोलार्डनं 2010 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. पोलार्डनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 189 सामने खेळले आहेत. तर, 3 हजार 412 धावा केल्या आहेत. ज्यात 16 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये पोलार्डच्या बॅटमधून 223 षटकार निघाले आहेत. तर, गोलंदाजीत त्याच्या नावावर एकूण 69 विकेट्सची नोंद आहे. 


हे देखील वाचा-