IPL Auction 2023 News : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16 व्या हंगामासाठी (IPL 2023) शुक्रवारी (23 डिसेंबर) कोची येथे लिलाव होणार आहे. लिलावाचे डिजिटल टेलिकास्ट जिओ सिनेमा (JioCinema) वर होणार असून याच्या एक दिवस आधी JioCinema ने मॉक ऑक्शन आयोजित केले. त्यात अनेक दिग्गज खेळाडूंची खरेदी करताना दिसून आले. मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाने (Suresh Raina) देखील लिलावात चेन्नई सुपर किंग्जला (CSK) पाठिंबा दिला असून तो खेळाडूनंतर सीएसकेसाठी एका वेगळ्या भूमिकेत दिसला.
मॉक ऑक्शनमध्ये रैना सीएसकेला दर्शवणारा पिवळा टी-शर्ट घालून आला होता आणि याद्वारे त्याने आपण चेन्नईच्या दिशेने राहणार असल्याचे दाखवले होते. या लिलावात रैनाने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला चेन्नईत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि खेळाडूला तब्बल 19.5 कोटी रुपयांना करारबद्ध केले. रैनाने मॉक ऑक्शनमध्ये जे काही केले त्यातून दिसून येतं की खऱ्या लिलावातही चेन्नई करनला मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करू शकते.
रैनाने यावर्षी आयपीएलला (IPL) अलविदा म्हटले आहे जेणेकरून तो इतर टी-20 लीगमध्ये खेळू शकेल. गेल्या आयपीएलमध्ये (IPL 2022) रैनाला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते आणि त्यानंतर त्याला हा निर्णय घ्यावा लागला. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर रैनाने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये भाग घेतला. यानंतर तो अबू धाबी टी10 लीगमध्येही सहभागी झाला आहे. काही परदेशी टी-20 लीगमध्येही तो खेळताना दिसतो.
आयपीएल 2023 ऑक्शनपूर्वी चेन्नईनं रिटेन केलेले खेळाडू
एमएस धोनी, रविंद्र जडेजा, डेवोन कोन्वे, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अंबाती रायडू, ड्वेन प्रिटोरियस, महीश तीक्ष्णा, प्रशांत सोळंकी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटनर, मथीसा पाथीराना आणि सुभ्रांशू सेनापती.
चेन्नईकडे किती पर्स व्हॅल्यू?
चेन्नई संघाने ख्रिस जॉर्डन आणि अॅडम मिल्नेसारखे खेळाडू सोडले आहेत. आता टीमकडे एकूण 20.45 कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे. त्याच वेळी, संघाकडे एकूण 2 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.
हे देखील वाचा-