IPL 2023 All 10 Franchises Head Coach Captains And Owners : आयपीएलचा आगामी हंगाम सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक संघांनी आपापली तयारी सुरु केली आहे. चाहत्यांमध्ये उत्साह दिसतोय. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक आयपीएल हंगामावेळी बदल केले जातात. आयपीएलच्या 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये दहा संघाचा सहभाग असेल, या संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. या दहा संघाबाबत सर्व माहिती जाणून घेणार आहोत... यामध्ये प्रशिक्षक, कर्णधार आणि मालकासह सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.  


दहा संघांचे मालक कोण आहेत?


चेन्नई सुपर किंग्स- एन श्रीनिवासन.
दिल्ली कॅपिटल्स- सज्जन जिंदल आणि जी. एम. राव.
गुजरात टायटन्स- स्टीव कोल्ट्स, डोनाल्ड मॅकेंजी आणि रोली वॅन रॅपार्ड.
लखनौ सुपर जायंट्स- संजीव गोएंका.
कोलकाता नाइट रायडर्स- शाहरुख खान, जूही चावला आणि जय महेता. 
मुंबई इंडियन्स- मुकेश अंबानी.
पंजाब किंग्स- मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीति जिंटा आणि करण पॉल.
राजस्थान रॉयल्स- मनोज बडाले, लाचलान मर्डोक आणि गॅरी कार्डिनेल.
सनरायजर्स हैदराबाद- कलानिधी मारन.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - युनायटेड स्पिरिट्स. 


दहा संघांचे कोच कोण आहेत?


चेन्नई सुपर किंग्स- स्टीफन फ्लेमिंग.
दिल्ली कॅपिटल्स- रिकी पाँटिंग.
गुजरात टायटन्स- आशिष नेहरा.
कोलकाता नाइट रायडर्स- चंद्रकांत पंडित.
लखनौ सुपर जायंट्स- एॅण्डी फ्लावर.
मुंबई इंडियन्स- मार्क बाउचर.
पंजाब किंग्स- ट्रेवर बेलिस.
राजस्थान रॉयल्स - कुमार संगकारा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - संजय बांगर.
सनरायजर्स हैदराबाद- ब्रायन लारा.


दहा संघाचे कर्णधार कोण आहेत?


चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी.
दिल्ली कॅपिटल्स- डेविड वार्नर.
गुजरात टायटन्स- हार्दिक पांड्या.
कोलकाता नाइट राइडर्स- श्रेयस अय्यर.
लखनौ सुपर जायंट्स- केएल राहुल.
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा.
पंजाब किंग्स- शिखर धवन.
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन.
रॉयल चैलेंजर्स बेंगलोर - फाफ डु प्लेसिस.
सनरायजर्स हैदराबाद- एडन मार्करम.


दहा संघाचे होम ग्राऊंड कोणते ?


चेन्नई सुपर किंग्स- एम. ए. चिदंबरम स्टेडियम.
दिल्ली कॅपिटल्स- अरुण जेटली स्टेडियम
गुजरात टायटन्स- नरेंद्र मोदी स्टेडियम.
कोलकाता नाइट रायडर्स- ईडन गार्डन्स.
लखनौ सुपर जायंट्स- बीआरएसएबीवी इकाना क्रिकेट स्टेडियम.
मुंबई इंडियन्स- वानखेडे स्टेडियम.
पंजाब किंग्स- इंद्रजीत सिंह बिंद्रा स्टेडियम.
राजस्थान रॉयल्स- सवाई मानसिंह स्टेडियम.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- एम. चिन्नास्वामी स्टेडियम.
सनरायजर्स हैदराबाद- राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम.


आयपीएल 2023 मध्ये 74 सामने


आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहेत. याप्रमाणे 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. आयपीएल 2023 चं आयोजन भारतातच होणार आहे. देशभरातील 12 मैदानावर सामने रंघणार आहे. प्रत्येक संघाचे सात सामने घरच्या मैदानावर होणार आहेत, तर सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर होणार आहेत. 


IPL 2023 Groups:


दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये प्रत्येकी दोन सामने होणार आहेत.