Shubman Gill's Sister Abused Online : अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने आरसीबीचा सहा विकेटने पराभव केला. करो या मरो च्या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली. विराट कोहलीच्या शतकावर गिलचे शतक भारी पडले. गिलच्या शतकाच्या बळावर गुजरातने आरसीबीचा पराभव केला. हा सामना आरसीबी चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. कारण, पुन्हा एकदा आरसीबीचे आयपीएल ट्रॉफी विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले. त्यानंतर चाहत्यांनी लाजीरवाणी कृत्य केले. आरसीबीच्या चाहत्यांनी शुभमन गिलच्या बहिणीला सोशल मीडियावर शिवीगाळ केली. शुभमन गिल याच्या शतकामुळे आरसीबी प्लेऑफमधून बाहेर गेली, असा समज करत चाहत्यांनी गिलच्या बहिणीला शिव्या दिल्या.
शुभमन गिल याच्या शतकी खेळीनंतर बहिणीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. शाहनील गिल हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांनी गिलच्या बहिणीला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली. इन्स्टाग्राम खात्यावर आपत्तीजनक पोस्ट करण्यात येत होती.
'ही' ऐतिहासिक कामगिरी करणारा युवा खेळाडू
गुजरात टायटन्सकडून या सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक झळकावलं. आरसीबीकडून विराट कोहलीनं शतकी खेळी करत गुजरातला विजयासाठी 198 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण शुभमन गिलच्या स्फोटक खेळीमुळे कोहलीची शतकी खेळी व्यर्थ गेली. शुभमन गिलने स्फोटक फलंदाजी करत सर्वांची मनं जिंकली. या सामन्यात शुभमन गिलनं शतक झळकावून बाबर आझमला मागे टाकत त्याचा विक्रम मोडीत काढला आहे. याआधी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 हून अधिक दावा करण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावे होता. आता शुभमनने नवा विक्रम नोंदवला आहे.
टी 20 क्रिकेटमध्ये 25 वेळा 50 हून अधिक धावा करणार युवा खेळाडू :
- शुभमन गिल : 23 वर्ष 255 दिवस
- अहमद शहजाद : 24 वर्ष 75 दिवस
- बाबर आजम : 24 वर्ष 135 दिवस
- ग्लेन फिलिप्स : 24 वर्ष 208 दिवस
- इशान किशन : 24 वर्ष 272 दिवस
आणखी एक विक्रम शुभमन गिलच्या नावे
आरसीबी विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिलने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 101 धावांची खेळी केली होती. आयपीएलच्या इतिहासात सलग दोन शतकं झळकावणारा शुभमन गिल चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी विराट कोहली, शिखर धवन आणि जोस बटलर यांनी ही कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये सलग दोन शतकं झळकवणारे खेळाडू
- शुभमन गिल : आयपीएल 2023
- विराट कोहली : आयपीएल 2023
- जोस बटलर : आयपीएल 2022
- शिखर धवन : आयपीएल 2020