IPL 2023 Flop Expensive Players : इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) यंदाचा सोळावा हंगाम सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2023) विराट कोहली (Virat Kohli), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यासारखे स्टार खेळाडू त्यांच्या दमदार फॉर्ममध्ये परतले. त्यासोबत अनेक युवा खेळाडूंनी त्यांच्या चमकदार खेळीने सर्वांचं लक्ष वेधलं. लाखो रुपयांना खरेदी केलेल्या खेळाडूंनी संघासाठी मोलाची कामगिरी केली. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च केलेले खेळाडू काही खास कामगिरी करू शकले नाहीत.


IPL Flop Players : महागड्या खेळाडूंकडून संघाची निराशा


आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये काही संघांनी कोट्यवधींची किंमत मोजून खेळाडू विकत घेतले. त्यांच्या नावाला साजेशी अशी तर काहींना त्याहून जास्त मानधन मिळालं. पण करोडोंचा खर्च करून या खेळाडूंचा शो फ्लॉप ठरला. आयपीएल 2023 च्या हंगामासाठी संघांनी या खेळाडूंवर कोट्यवधी रुपये खर्च केले, परंतु हे खेळाडू संघांच्या विश्वासावर टिकू शकले नाहीत. या यादीत अनेक मोठ्या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे.


सॅम करन - पंजाब किंग्स


सॅम करन इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. सॅम करनला पंजाब किंग्स संघने 18.50 कोटींना विकत घेतलं. पण, या अष्टपैलू खेळाडूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. गोलंदाजीसोबतच इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने फलंदाजीतही निराशा केली. विशेष म्हणजे पंजाब किंग्सने सॅम करनला 17.50 कोटी रुपयांच्या किमतीला खरेदी केलं. ही आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक बोली आहे. पण सॅम करनला या किमतीला साजेशी खेळी करता आली नाही.


हॅरी ब्रूक - सनरायझर्स हैदराबाद


सनरायझर्स हैदराबादने जवळपास 13 कोटी रुपये खर्च करून हॅरी ब्रूकचा संघात समावेश केला, मात्र या फलंदाजाने आपल्या कामगिरीने संघाची निराशा केली. हॅरी ब्रूक आयपीएल 2023 च्या हंगामात 11 सामन्यात केवळ 190 धावा करू शकला. त्यामुळे हॅरी ब्रूक हा महागडा खेळाडू सनरायझर्स हैदराबाद संघासाठी फ्लॉप ठरला.


जोफ्रा आर्चर - मुंबई इंडियन्स


मुंबई इंडियन्सने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला आठ कोटी रुपयांना विकत घेतलं, पण दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धा खेळू शकला नाही. तो काही मोजके सामने वगळता इतर सामन्यांमध्ये बेंचवर होता. यापूर्वी जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आयपीएल 2022 मध्ये खेळू शकला नव्हता. यंदाही तो आयपीएल 2023 संपण्याआधीच दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर गेला.


मुकेश कुमार - दिल्ली कॅपिटल्स


दिल्ली कॅपिटल्सने वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला 5.50 कोटींना विकत घेतलं. दिल्ली कॅपिटल्सला मुकेश कुमारकडून उत्तम गोलंदाजीची अपेक्षा होती, पण या गोलंदाजाने संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांची निराशा केली.


बेन स्टोक्स - चेन्नई सुपर किंग्स


आयपीएल 2022 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने बेन स्टोक्सवर 16.25 कोटी रुपये खर्च करुन संघात सामील केलं होते. चेन्नई सुपर किंग्ज संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना या अष्टपैलू खेळाडूकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, पण दुखापतीमुळे तो यंदाच्या आयपीएलमधील बहुतांश सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. याशिवाय,  बेन स्टोक्स प्लेऑफच्या महत्त्वाच्या सामन्याआधीच आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे हा महागड्या खेळाडूनंही चेन्नई संघाची निराशा केली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2023 : यंदाच्या आयपीएलमध्ये षटकारांचा पाऊस, सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-5 फलंदाजांची यादी पाहा