Arjun Tendulkar IPL Debut : आयपीएलच्या 16 व्या हंगामात मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आयपीएलमध्ये (IPL 2023) पदार्पण केलं. दीर्घ प्रतिक्षेनंतर अर्जुनालाही संधी मिळाली. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. दीर्घ प्रतिक्षेनंतर अर्जुनालाही संधी मिळाली. अर्जुन तीन वर्षांपासून संघाचा भाग आहे. मागील दोन वर्ष तो बेंचवर होता. पण यंदाच्या वर्षी त्याला मुंबईकडून आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. अर्जुनच्या पर्दापणानंतर मास्टरब्लास्टरने लेकासाठी खास भावनिक पोस्ट शेअर केली आहे.


मास्टर ब्लास्टरची अर्जुनसाठी भावनिक पोस्ट, 'तुझा बाप म्हणून…'


सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे की, ''अर्जुन, आज तू क्रिकेटपटू म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहेस. तुझा बाप या नात्याने, तुझ्यावर प्रेम करणारा आणि खेळाबद्दल उत्कंठ प्रेम करणारा म्हणून मला खात्री आहे की तु या खेळाला योग्य तो आदर देशील आणि खेळामुळे तुला खूप प्रेमही मिळेल. तु इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहेस आणि मला खात्री आहे की तु पुढेही हेच करशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. ऑल द बेस्ट!''






सचिन तेंडुलकरच्या 'लेका'चं आयपीएलमध्ये पदार्पण


अर्जुन तेंडुलकर 2021 च्या मोसमापासून मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग आहे. पण, त्याला मागील दोन हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबईने अखेर अर्जुनला यंदाच्या मोसमात पदार्पणाची संधी देण्याचा निर्णय घेतला. आपल्या पहिल्या आयपीएल सामन्यात अर्जुनने दोन षटकांच्या गोलंदाजीमध्ये 17 धावा दिल्या पण त्याला एकही विकेट घेता आली नाही.


दोन वर्ष बेंचवर, यंदा मिळाली संधी


सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मागील दोन हंगाम मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात अर्जुनला आयपीएलमध्ये पदार्पण करता आलं नाही. दोन्ही सीझन तो बेंचवर होता. त्यामुळे यंदा तरी अर्जुनला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


सचिनच्या लेकाचं आयपीएलमध्ये पदार्पण, कोलकात्याविरोधात अर्जुन उतरला मैदानात