PBKS vs LSG, 2022 : आयपीएल 2022 मध्ये शुक्रवारी 42 वा सामना खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये पुण्याच्या एमसीए मैदानावर सामना रंगणार आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालाली लखनौ टीम लयीत दिसत आहे. दुसरीकडे पंजाबने कसबसं स्वत:चं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. केएल राहुल आणि मयांक अग्रवाल...हे दोन मित्र शुक्रवारी आयपीएलच्या मैदानात एक दुसऱ्याविरोधात उभे राहणार आहेत. लखनौविरोधात विजय मिळवण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला केएल राहुलची बॅट शांत ठेवावी लागणार आहे. लखनौविरोधात विजय मिळवण्यासाठी राहुलची बॅट शांत ठेवण्याचं ध्येय प्रतिस्पर्धी पंजाब संघाचं असणार आहे. 


राहुलच्या नेतृत्वातील लखनौच्या संघाने पाच विजय मिळवले आहेत. लखनौला तीन पराभवाला सामोरं जावे लागलेय. लखनौचा संघ 10 गुणांसह चौथ्या क्रमांकवर आहे. तर पंजाबचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. पंजाबच्या संघाने आठ सामन्यात चार विजय मिळवले आहेत. लखनौचा कर्णधार केएल राहुल सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. राहुलने मुंबईविरोधात यंदा दोन शतके झळकावली आहेत. राहुलच्या नावावर एक अर्धशतकही आहे. यंदाच्या हंगामात राहुल सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने यंदा दोन शतकासह 368 धावा चोपल्या आहेत. राजस्थानचा जोस बटलर राहुलच्या पुढे आहे. 


पुण्याच्या एमसीए मैदानावर धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कगिसो रबाडाच्या नेतृत्वात पंजाबची गोलंदाजी तगडी वाटतेय. पण राहुल-डिकॉकमुळे लखनौची फलंदाजी मजबूत दिसत आहे. त्याशिवाय स्टॉयनिस, बडोनी आणि हेटमायरसारखे पॉवरहिटर लखनौकडे आहेत. त्यामुळे सामना रोमांचक होणार यात शंका नाही. 


कधी आहे सामना?
आज 29 एप्रिल रोजी होणारा पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
पंजाब आणि लखनौ यांच्यातील सामना पुण्यातील एमसीए मैदानावर होणार आहे.  
कुठे पाहता येणार सामना?
पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.