RR vs RCB, Match Highlights : आरसीबीचा विजय, राजस्थानचा चार विकेटनं पराभव

RR vs RCB, IPL 2022: आयपीएलमध्ये आजचा तेरावा सामना दोन रॉयल संघात लढवण्यात येणार आहे. बंगळुरु आणि राजस्थान यांच्यातील आजच्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करणार हे नक्की..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Apr 2022 11:31 PM
IPL 2022, RR vs RCB, Live Score : आरसीबीला सहावा धक्का, शाहबाज बाद

IPL 2022, RR vs RCB, Live Score : ट्रेंट बोल्टने शाहबाजला बाद करत आरसीबीला सहा धक्का दिला. शाहबाजने 45 धावांची दमदार खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ला 13 चेंडूत 7.38 rpo प्रति ओवर सरासरी ने 16 धावांची गरज



 

IPL 2022, RR vs RCB, Live Score : कार्तिकने डाव सावरला, सामना रोमांचक स्थितीत
IPL 2022, RR vs RCB, Live Score : बेंगलोरचा अर्धा संघ तंबूत, रुदरफोर्ड बाद

IPL 2022, RR vs RCB, Live Score : नवदीप सैनीने बेंगलोरला पाचवा धक्का दिला. रुदरफोर्ड पाच धावा काढून बाद झाला.  

IPL 2022, RR vs RCB, Live Score : आरसीबीला मोठ्ठा धक्का, विराट कोहली बाद
IPL 2022, RR vs RCB, Live Score : आरसीबीला पहिला धक्का, कर्णधार फाफ डु प्लेसिस बाद

IPL 2022, RR vs RCB, Live Score : आरसीबीला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार फाफ डु प्लेसिस बाद झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ला 76 चेंडूत 8.84 rpo प्रति ओवर सरासरी ने 112 धावांची गरज

RR vs RCB : बंगळुरुचे सलामीवीर मैदानात

फाफ डु प्लेसीस आणि अनुज रावत सलामीला मैदानात आले आहेत.

RR vs RCB : जोस-हीटमायरची धडाकेबाज खेळी, 20 ओव्हरनंतर राजस्थान 169/3

जोस बटलनरने अर्धशतक (70) पूर्ण केलं असून हीटमायरने देखील त्याच्यासोबत 43 धावांची चांगली खेळी केली. त्यामुळे आता बंगळुरुसमोर 170 धावांचं लक्ष आहे. 

RR vs RCB : आरसीबीच्या 100 धावा पूर्ण

जोस बटलरने फलंदाजीची धुरा सांभाळली असून शिमरॉनची त्याला सोबत आहे. त्यामुळे राजस्थानने 100 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

RR vs RCB : राजस्थानचा कर्णधार बाद

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन हसरंगाच्या ओव्हरमध्ये 8 धावा करुन बाद झाला आहे.

राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का

देवदत्त पडिक्कल 37 धावा करून बाद (76-2)

RR vs RCB : राजस्थानला पहिला झटका

राजस्थानला पहिला झटका बसला असून यशस्वी जैस्वालला डेविड विलीने बाद केलं आहे.

RR vs RCB : राजस्थानचे सलामीवीर मैदानात

सामन्याला सुरुवात झाली असून राजस्थानकडून यशस्वी आणि बटलर मैदानात उतरले आहेत.

RR vs RCB : राजस्थान अंतिम 11 

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हिटमायर, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, नवदीप सैनी, ट्रेन्ट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा. 

RR vs RCB : बंगळुरुचे अंतिम 11  

फाफ डु प्लेसीस(कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफेन रुदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेविड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज. 


 

RCB vs RR : नाणेफेक जिंकत बंगळुरुचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

आजची विकेट पाहता नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी घेणार यात शंका नाही. त्याप्रमाणेच आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एक चौकार आणि विराट पूर्ण करणार 550 आयपीएल चौकार

विराट कोहली आजच्या सामन्यात एक चौकार ठोकत आयपीएल कारकिर्दीत 550 चौकार पूर्ण करु शकतो.

IPL 2022, RR vs RCB, Live Score : बेंगलोरची संभाव्य प्लेईंग 11

IPL 2022, RR vs RCB, Live Score : फाफ डु प्लेसीस(कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफेन रुदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेविड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज

IPL 2022, RR vs RCB, Live Score : राजस्थानची संभाव्य अंतिम 11  

IPL 2022, RR vs RCB, Live Score : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हिटमायर, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, नवदीप सैनी, ट्रेन्ट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा.

IPL 2022, RR vs RCB, Live Score : कुणाचं पारडं जड, पाहा आकडेवारी

IPL 2022, RR vs RCB, Live Score : आयपीएलमध्ये आजवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्या एकमेंकाविरुद्धच्या सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी आजवर 24 सामने एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. यामध्ये आरसीबी संघाचं पारडं काहीसंच जड आहे. कारण 24 मधील 12 सामने त्यांनी जिंकले असून 10 सामने राजस्थानने जिंकले आहेत. तर दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत. त्यामुळे दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत आजवर पाहायला मिळाल्याने आजचा सामनाही चुरशीचा होणार यात शंका नाही.  

पार्श्वभूमी

RR vs RCB, Live Updates : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज एक रॉयल लढत पाहायला मिळणार आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु(RR vs RCB) यांच्यातील आजचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात होणार असल्याने एक मोठी धावसंख्या उभी राहण्याचीही शक्यता आहे. दरम्यान दोन्ही संघासाठी आज विजय मिळवणं अवघड असेल, कारण दोन्ही संघानी आतापर्यंत हंगामात उत्तम कामगिरी केली आहे. राजस्थानने दोन पैकी दोन सामने जिंकले असून आरसीबीनेही एक सामना जिंकला आहे.  


संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाखाली राजस्थानला (RR) आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली आहे. दुसरीकडे आरसीबी संघाला नवा कर्णधार मिळाला असला तरी विराटचा अनुभवसोबत असल्याने त्यांची कामगिरीही उत्तम दिसत आहे. दरम्यान आतापर्यंतचा इतिहास पाहता, दोन्ही संघानी आजवर 24 सामने एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. यामध्ये आरसीबी संघाचं पारडं काहीसंच जड आहे. कारण 24 मधील 12 सामने त्यांनी जिंकले असून 10 सामने राजस्थानने जिंकले आहेत. तर दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत.  


हैदराबादचे संभाव्य अंतिम 11  


अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विलियमसन (कर्णधार), निकोलस पूरन (विकेटकीपर), अॅडन मार्करम, अब्दुल समाद, वॉशिंग्टन सुंदर, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उम्रान मलिक.


लखनौ संभाव्य अंतिम 11 


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हु़डा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, दुश्मंता चमीरा, अँड्रयू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान


 हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.