RR vs KKR : आज आयपीएलमधील (IPL 2022) राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (RR vs KKR) या सामन्यात दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न होणार यात शंका नाही. कारण दोन्ही संघानी आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा विजय दोघांचा यंदाच्या स्पर्धेतील चौथा विजय असेल. केकेआरने आतापर्यंत सहापैकी तीन सामने जिंकले असून तीन गमावले आहेत. तर राजस्थानने पाच सामने खेळत तीन जिंकले असून दोन गमावले आहेत.


आयपीएलमध्ये (IPL 2022) आज होणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (RR vs KKR) या सामन्यात राजस्थान संघाचा सध्याचा फॉर्म पाहता त्याचं आव्हान कोलकात्यासाठी अवघड असेल. दुसरीकडे केकेआर संघाचा यंदाचा फॉर्म काहीसा सुमार आहे, कारण त्यांनी तीन सामने जिंकले असून तीन गमावले देखील आहेत. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज 18 एप्रिल रोजी होणारा राजस्थान विरुद्ध कोलकाता सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


 हे देखील वाचा-