GT Vs CSK, IPL 2022:  पुण्याच्या महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 29 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 3 विकेट्सनं विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघानं चेन्नईच्या तोंडातून विजयी घास हिसकावला आहे. 


गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सामन्यातील 10 महत्वाचे मुद्दे-


- हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्यानं गुजरातचं नेतृत्व राशीद खानवर सोपवण्यात आलं.


- राशीद खाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.


- ऋतुराज गायकवाडनं 73 आणि अंबाती रायडूनं 46 धावांची खेळी केली. 


- गुजरातच्या संघानं कमबॅक करत चेन्नईला 169 धावात रोखलं.


- अल्झारी जोसेफनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, मोहम्मद शामी आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली. 


- चेन्नईनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची खराब सुरूवात. गुजरातनं 50 धावांच्या आत चार विकेट्स गमावल्या.


- लागोपाठ विकेट्स पडत असताना डेव्हिड मिलरनं संघाचा डाव सावरला. मिलरनं 94 धावांची मॅच विनिंग खेळी केली. 


- मोक्याच्या क्षणी राशीद खाननं 40 धावांची तुफानी खेळी करत सामना गुजरातच्या बाजूनं झुकवला. 


- सुरुवातीला अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या चेन्नईच्या गोलंदाजांना अखेरच्या दहा षटकात आपली लय कायम ठेवता आली नाही. त्यामुळं सामना हातातून निसटला.


- इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनं खराब गोलंदाजी केली. त्यानं 3.5 षटकात 58 धावा खर्च केल्या. जॉर्डनच्या अखेरच्या दोन षटकामुळं सामन्याचा निकाल गुजरातच्या बाजूनं लागला.


हे देखील वाचा-