RR vs DC, Match Highlights: दिल्लीचा राजस्थानवर दमदार विजय, 8 गडी राखून दिली मात

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात आमने-सामने उतरणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 May 2022 11:09 PM
RR vs DC : दिल्लीचा राजस्थावर 8 गडी राखून विजय

मिचेल मार्शच्या दमदार खेळीसह वॉर्नरच्या अर्धशतकाने दिल्लीला विजय मिळवून दिला आहे.

RR vs DC : मार्शचं अर्धशतक हुकलं

89 धावा करुन मिचेल मार्श बाद झाला आहे. चहलने त्याला तंबूत धाडलं आहे.

RR vs DC : दिल्ली विजयाच्या दिशेने वेगात

वॉर्नर आणि मार्श जोडीने शतकी भागिदारी पूर्ण केली आहे. त्यामुळे दिल्ली आता विजयाच्या दिशेने पुढे जात आहे.

RR vs DC : मार्शचं अर्धशतक पूर्ण

मिचेल मार्शने दमदार असं अर्धशतक झळाकावलं आहे. मार्श आणि वॉर्नरने एक दमदार भागिदारी उभारली आहे.

RR vs DC : मार्श-वॉर्नरने सांभाळला डाव

शून्यावर एक विकेट गमावलेल्या दिल्लीचा डाव डेव्हिड वॉर्नर आणि मार्शने सांभाळला असून सात ओव्हरनंतर दिल्लीचा स्कोर आहे 54 वर एक बाद आहे.

RR vs DC : राजस्थानची दमदार सुरुवात, दिल्ली 0/1

दिल्लीचा सलामीवीर केएस भरत शून्य धावांवर बाद झाल्यामुळे दिल्लीने शून्य धावांवर पहिला गडी गमावला आहे. बोल्टने ही विकेट घेतली आहे.

RR vs DC : दिल्लीला विजयासाठी 161 धावांची गरज

राजस्थानची फलंदाजी आटोपली असून त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 161 धावांचे आव्हान दिले आहे.

RR vs DC : पडिक्कलचं अर्धशतक हुकलं

राजस्थानचा युवा फलंदाज पडिक्कलचं अर्धशतक थोडक्यात हुकलं असून तो 48 धावा करुन बाद झाला आहे. नॉर्खियानेच त्याला बाद केलं आहे.

RR vs DC : रियान पराग बाद

चेतन साकरियाने आणखी एक राजस्थानचा गडी रियान परागच्या रुपात बाद केला आहे. पराग 9 धावा करुन बाद झाला आहे.

RR vs DC : कर्णधार संजूही बाद

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन केवळ 6 धावा करुन तंबूत परतला आहे. नॉर्खियाने त्याला बाद केलं आहे.

RR vs DC : आश्विनही बाद

राजस्थानचा डाव एकहाती सांभाळणारा आर आश्विनही 50 धावा करुन बाद झाला आहे. मिचेल मार्शनेच त्याला बाद केलं आहे.

RR vs DC : राजस्थानच्या 100 धावा पूर्ण

राजस्थान संघाला आश्विनने सांभाळलं असून पडिक्कलने त्याला साथ दिल्याने राजस्थान संघाने 100 धावांचा टप्पा पार केला आहे.

यशस्वी जैस्वाल तंबूत परतला

9व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर राजस्थानला दुसरा धक्का बसला आहे. मिचेल मार्शने आपल्या दुसऱ्याच षटकात संघाला यश मिळवून दिले. मार्शने यशस्वी जैस्वालला (19) झेलबाद केले. 

RR vs DC : राजस्थानचा सलामीवीर बटलर बाद

राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर आज स्वस्तात तंबूत परतला आहे. चेतन साकरियाने त्याला 7 धावांवर तंबूत धाडलं आहे.

RR vs DC : नाणेफेक जिंकत दिल्लीने निवडली गोलंदाजी

सामन्यापूर्वी नुकतीच नाणेफेक झाली असून प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय दिल्ली संघाने घेतला आहे.

RR vs DC : दिल्ली संभाव्य अंतिम 11  

ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, शार्दूल ठाकूर. 

RR vs DC : राजस्थान संभाव्य अंतिम 11

संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, करुन नायर, रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल


 

RR vs DC : आज दिल्ली-राजस्थान आमने सामने

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) या दोन्ही संघात सामना पार पडणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असणाऱ्या आजच्या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

पार्श्वभूमी

RR vs DC, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 58 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC)  या दोन संघात पार पडत आहे. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये पार पडणाऱ्या आजच्या सामन्यात दोन्ही संघामध्ये पुढील फेरीत पोहचण्यासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. 


गुणतालिकेत राजस्थानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. त्यांनी 11 पैकी 7 सामने जिंकत 14 गुण मिळवले आहेत. त्यांचा रनरेटही चांगला असल्याने ते तिसऱ्या स्थानावर आहेत. तर दिल्लीचा संघ 11 पैकी 5 सामनेच जिंकल्याने 10 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. राजस्थानचे पुढील फेरीत पोहोचण्याचे चान्सेस अधिक असले तरी दिल्लीचं आव्हान त्यांना अवघड असल्याने आजचा सामना अटीतटीचा होऊ शकतो. त्यात आजचा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानावर होणार आहे. या मैदानावर मागील सामन्यात मुंबईच्या बुमराहने 5 विकेट्स घेत इतिहास रचला. तर त्यानंतर त्या सामन्यातच केकेआरने मुंबईला अवघ्या 113 धावात ऑलआऊट केलं. त्यामुळे याठिकाणी वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असल्याने सामना चुरशीचा होऊ शकतो.  


राजस्थान संभाव्य अंतिम 11  -


संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, करुन नायर, रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल


दिल्ली संभाव्य अंतिम 11  -


ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, शार्दूल ठाकूर. 


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.