IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा पहिला किताब राजस्थान रॉयल्सनं 2008 मध्ये जिंकला होता. आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या संघात एक युवा खेळाडू होता. या खेळाडूनं आपल्या दमदार खेळीनं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. तो खेळाडू म्हणजे, 'सर' रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja). राजस्थाननं जाडेजाला अंडर-19 संघातून निवडलं होतं. जाडेजा 2018 चा वर्ल्ड कप विजेता अंडर-19 संघाचे सदस्य होता. आता हाच युवा खेळाडू आयपीएलमधील एका संघाची कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे. महेंद्र सिंह धोनीनं चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधार पदाची धुरा आपला हुकमी एक्का रवींद्र जाडेजाकडे सोपवली आहे. 


33 वर्षाचा रवींद्र जाडेजा 2012 मध्ये चेन्नईच्या संघात सामील झाला होता. चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणारा रवींद्र जाडेजा तिसरा कर्णधार ठरणार आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं नेतृत्व केलंय. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं 213 पैकी 130 सामने जिंकले आहेत. तर, धोनीच्या गैरहजेरीत सुरेश रैनानं सहा सामन्याचं नेतृत्व केलंय. यातील दोन सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आलाय. 


ऑलराउंडर जाडेजानं यापूर्वीच्या दोन आयपीएल सीझनमध्ये 430 धावा ठोकल्या होत्या. या दरम्यान, त्यानं पहिल्या सीझनमध्ये 131.06 च्या स्ट्राइक रेटनं 135 धावा केल्या होत्या. जाडेजाच्याच दमदार कामगिरीच्या जीवावर राजस्थानच्या संघानं पहिल्या आयपीएलच्या किताबाला गवसणी घातली होती. 



जाडेजावर 2010 मध्ये एका वर्षांसाठी घातली होती बंदी 


आयपीएलमधल्या उत्तम खेळीच्या जोरावर जाडेजानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. 8 फेब्रुवारी 2009 मध्ये जाडेजानं श्रीलंकेविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला पहिला सामना खेळला. पण त्यानंतर जाडेजाच्या क्रिकेट करिअरमध्ये एक वळण आलं. 2010 मध्ये जाडेजावर कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केल्याप्रकरणी एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. 


दरम्यान, 2009 मधील आयपीएल सीझननंतर रवींद्र जाडेजा विरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत राजस्थानच्या संघासोबत कॉन्ट्रॅक्टमध्ये असतानाही दुसऱ्या फ्रेंचायजीसोबत डील केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. राजस्थानच्या संघानं 2008 मध्ये तीन सीझन्ससाठी जाडेजासोबत करार केला होता. पण जाडेजाची केवळ 2009 पर्यंतच संघासोबत खेळण्याची इच्छा होती. त्यामुळे जाडेजाला दोषी ठरवत त्याच्यावर एक वर्षांची बंदी घातली होती. 


आयपीएल गवर्निंग काउंसिलच्या वक्तव्यानुसार, जाडेजानं त्यावेळी मुंबई इंडियन्ससोबत डिल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यानं मुंबई संघाच्या प्रतिनिधींना कागपत्र पाठवण्याचीही तयारी दर्शवली होती. 


चेन्नई सुपर किंग्सचे शिलेदार


रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)


महत्त्वाच्या इतर बातम्या :