MS Dhoni Captaincy Record : आयपीएलच्या 15 व्या हंगमात मोठ बदल पाहायला मिळणार आहेत. रणसंग्रमाला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस बाकी असतानाच दिग्गज खेळाडू एम.एस. धोनीने चेन्नई संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. चेन्नई संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आता रवींद्र जाडेजाच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जने अधिकृत ट्वीटर खात्यावरुन याबाबतची घोषणा केली आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक राहिलाय. जागतिक क्रिकेटप्रमाणेच धोनीने आयपीएलमध्येही आपल्या नेतृत्वाने सर्वांची मनं जिंकली आहे. पाहूयात कॅप्टन कूलचे कर्णधार म्हणून कशी कमागिरी आहे....
आयपीएलमध्ये 2008 पासून 2021 पर्यंत एम. एस. धोनीने आपल्या संघासाठी अनेक कठीण निर्णय घेतले आहे. धोनीच्या निर्णयाचा संघाला फायदाच झालेला दिसला आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने चार वेळा आयपीएल चषकावर नाव कोरलं आहे. धोनीमुळेच चेन्नई आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी संघ आहे. धोनीने चेन्नईशिवाय आयपीएलमध्ये पुणे संघाचे नेतृत्वही केले आहे. धोनीने 204 आयपीएल सामन्यात नेतृत्व केले आहे. यापैकी 121 सामन्यात संघाला विजय मिळाला आहे. 82 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. धोनीच्या नेतृत्वात संघाची विजयाची टक्केवारी 59.60 टक्के इतकी आहे. आणखी एक खास बाब म्हणजे, धोनीच्या नेतृत्वात संघ 8 वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचलाय. तर तब्बल 11 वेळा प्लेऑफपर्यंत मजल मारली आहे.
आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स संघासोबत होणार आहे. 26 मार्ज रोजी मुंबईत दोन संघ आमने सामने येणार आहेत. तर अखेरचा लीग सामना 20 मे रोजी राजस्थान रॉयल्स या संघासोबत होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे शिलेदार
रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)