IPL 2022 Prize Money: आयपीएलचा पंधराव्या हंगामाला कधी सुरुवात होते? याची उत्स्तुकता लागलेल्या क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा आज संपणार आहे. आजपासून आयपीएल 2022 च्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं आयपीएलचा पंधरावा हंगाम आणखी रंगतदार होण्याची अपेक्षा केली जात आहे. यावर्षी आयपीएलच्या फॉरमेटमध्येही बदल करण्यात आलाय. यावेळी संघाना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलंय. तसेच ख्रिस गेल, एबी डिविलियर्स आणि सुरेश रैना यांसारखे दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये दिसणार नाहीत.
आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, आयपीएलमध्ये विजेता संघाला किती रक्कम मिळते? एवढेच नव्हेतर, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेता खेळाडूला या स्पर्धेत किती पैसे मिळतात? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
कोणाला किती रक्कम मिळते?
विजेता संघ- 20 कोटी.
रनर-अप संघ- 13 कोटी.
तिसऱ्या क्रमांकाचा संघ- 7 कोटी.
चौथ्या क्रमांकाच संघ- 6.5 कोटी.
एमर्जिंग प्लेयर- 20 लाख.
सुपर स्टायकर- 15 लाख.
ऑरेंज कॅप- 15 लाख.
पर्पल कॅप- 15 लाख.
पॉवर प्लेयर ऑफ द सीजन- 12 लाख.
मोस्ट वॅल्यूबल प्लेअर- 12 लाख.
गेमचेंजर ऑफ द सीजन- 12 लाख.
सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू- 12 लाख.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या संघाचं कर्णधारपदं सोडलं. यंदाच्या हंगामात रवींद्र जाडेजा चेन्नईच्या संघाचं कर्णधारपदं संभाळणार आहे. तर, भारताचा तडाखेबाज फंलंदाज श्रेयस अय्यर कोलकाताच्या संघाचं नेतृत्व करणार आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022: चेन्नई आणि कोलकाता यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा महत्वाची आकडेवारी
- PAK VS AUS: बाप को भेज, तेरे बस की बात नही! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानचे चाहते भडकले
- IPL 2022: श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी! एकानं वनडेत चोपलं, दुसऱ्यानं कसोटीत धुतलं, आज दोघंही आमने-सामने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha