Asian Games 2022 Postponed : जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूमुळे कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. भारतात तसेच जगभरात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. मात्र, चिनी माध्यमांनी या संदर्भात शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, याच वाढत्या रूग्णांची संख्या पाहता आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे मानले जात आहे.
एका अहवालानुसार, आशिया ऑलिम्पिक कौन्सिलने शुक्रवारी सांगितले की, 10 ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणार्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा होणार होत्या. मात्र, आता या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. चीनमध्ये कोविड-19 (Covid-19) संबंधित प्रकरणे सातत्याने वाढत असल्याने ही घोषणा करण्यात आली आहे असे या अहवालात म्हटले आहे.
2022 आशियाई खेळ जे सप्टेंबरमध्ये हांगझोऊ येथे होणार होते ते आता पुढे ढकलण्यात आले आहेत. चीनच्या राज्य माध्यमांनी शुक्रवारी या संदर्भात माहिती दिली. आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यामागे ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाने कोणतेही कारण दिलेले नाही, मात्र चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे मानले जात आहे.
हाँगझोऊ शांघाय जवळ स्थित आहे. चीनमधील सर्वात मोठे शहर शांघायमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे वाढत आहेत. अशा परिस्थितीत तेथे लॉकडाऊन लागू करण्यात आला. आशियाई खेळांबाबत, आयोजकांनी सांगितले होते की त्यांनी चीनच्या पूर्व भागातील 12 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या हांगझोऊ येथे आशियाई खेळांसाठी सुमारे 56 स्पर्धा स्थळांचे बांधकाम पूर्ण केले आहे.
महत्वाच्या बातम्या :