KKR vs SRH, IPL 2022 : कोलकात्याचा विस्फोटक फलंदाज नितीश राणा याने हैदराबादविरोधात अर्धशतकी खेळी केली. राणाच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने 175 धावा फलकावर लावल्या. आघाडीची फळी कोसळल्यानंतर राणाने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. राणाने विस्फोटक फलंदाजीदरम्यान हैदराबादच्या सर्वाच गोलंदाजांची धुलाई केली. यामध्ये उमरान मलिकचाही समावेश होता. उमरानच्या एका चेंडूला राणाने थेट सिमारेषाबाहेर मारला. या चेंडूमुळे फ्रिजची काच तुटली. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


13 वे षटक टाकण्यासाठी उमरान मलिक आला होता. उमरान मलिकच्या एका चेंडूवर नितीश राणाने प्लॅट षटकार लगावला. या षटकाराने हैदराबादच्या डगाउटमध्ये असलेल्या फ्रिजची काच फोडली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
पाहा व्हिडिओ






एका बाजूला विकेट पडत असताना नितेश राणाने संयमी फलंदाजी केली. नितेश राणाने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. राणाने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान राणाने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. पण मोक्याच्या क्षणी नितेश राणा बाद झाला. 


कोलकात्याचा सात विकेटनं पराभव, राहुल त्रिपाठीनं धुतलं
राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर हैदराबादने कोलकात्याचा सात गड्यांनी पराभव केला आहे. यासह हैदराबादने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. कोलकात्यानं दिलेलं 176 धावांचं आव्हानं हैदराबादने सात विकेट आणि 13 चेंडू राखून पार केले. कोलकात्याच्या एकाही गोलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. राहुल त्रिपाठी आणि मार्करमच्या वादळापुढे कोलकात्याची गोलंदाजी दुबळी दिसत होती. कोलकात्यानं दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात अभिषेक शर्मा बाद झाला. त्यानंतर कर्णधार विल्यमसनही माघारी परतला. अभिषेक शर्मा 3 तर विल्यमसन 17 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि मार्करम यांनी हैदराबादला विजय मिळवून दिला. दोघांनी कोलकात्याची गोलंदाजी फोडून काढली. राहुल त्रिपाठीने 37 चेंडूत 71 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान राहुलने सहा षटकार आणि चार चौकार लगावले. तर एडन मार्करम याने 36 चेंडूत 68 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान मार्करम याने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांनी 54 चेंडूत 94 धावांची भागिदारी केली. कोलकात्याच्या गोलंदाजांना अचूक टप्यावर मारा करता आला नाही. राहुल-मार्करम यांनी प्रत्येक गोलंदाजांची धुलाई केली. कोलकात्याकडून रसेलने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्सला एक विकेट मिळाली.