MI vs SRH : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs sunrisers hyderabad) हे संघ आमने-सामने असणार आहेत. दोघांचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पण दोन्ही संघात दमदार खेळाडूंची फौज असल्याने आज एक दमदार लढत क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळू शकते. 


आज होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (MI vs SRH) या सामन्यात दोघांचे आव्हान सपुंष्टात आले असले तरी अस्तित्त्वाच्या लढाईसाठी दोन्ही संघाकडून विजय मिळवण्याकरता शर्थीचे प्रयत्न केले जाणार यात शंका नाही. यंदा मुंबई इंडियन्सने 12 पैकी 9 सामने गमावल्याने ते नवव्या स्थानी आहेत. तर दुसरीकडे सनरायजर्स हैदराबाद संघाने 12 पैकी 7 सामने गमावत 5 सामनेच जिंकल्याने ते आठव्या स्थानी आहेत. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज 16 मे रोजी होणारा मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-