MI vs KKR, Match Highlights : मुंबईचा सलग तिसरा पराभव, कोलकाताने पाच विकेटनं हरवलं

MI vs KKR, IPL 2022: आयपीएलमध्ये आजचा चौदावा सामना मुंबई विरुद्ध कोलकाता यांच्यात पार पडणार असून यंदाचा केकेआरचा फॉर्म पाहता मुंबईसमोर एक तगड आव्हान असेल.

abp majha web team Last Updated: 06 Apr 2022 11:02 PM
MI vs KKR : कमिन्सचं वादळ, वेंकटेशचा संयम, मुंबईचा तिसरा पराभव

MI vs KKR : पॅट कमिन्सची वादळी खेळी त्याला वेंकटेशची संयमी साथ, या जोरावर कोलकाता संघाने मुंबईचा पाच विकेटनं पराभव केला आहे.  

MI vs KKR : एम. अश्विनचा कोलकात्याला दुसरा धक्का, नितेश राणा बाद

MI vs KKR : नितेश राणाला बाद करत अश्विनने कोलकाताला चौथा धक्का दिला आहे. राणा 8 धावा काढून बाद झाला. कोलकाता चार बाद 83 धावा

MI vs KKR : कोलकात्याला तिसरा धक्का, बिलिंग्स बाद

MI vs KKR : एम अश्विनने सॅम बिलिंग्सला बाद करत मुंबईला तिसरे यश मिळवून दिले. बिलिंग्स 17 धावांवर बाद झाला. कोलकाता नाईट रायडर्स ला 61 चेंडूत 9.34 प्रति ओवर सरासरी ने 95 धावांची गरज



 

MI vs KKR : केकेआरचा कर्णधारही बाद

कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरही 10 धावा करुन बाद झाला आहे. डॅनियल सॅम्सने त्याला बाद केलं आहे.

MI vs KKR : केकेआरला पहिला झटका, रहाणे बाद

केकेआरचा सलामीवीर अजिंक्य रहाणे 7 धावा करुन बाद झाला आहे. टायमल मिल्सने त्याला बाद केलं आहे.

MI vs KKR : केकेआरचे सलामीवीर मैदानात

162 धावांचे आव्हान गाठण्यासाठी केकेआरचे सलामीवीर मैदानात आले आहेत. सध्या वेंकटेश आणि अजिंक्य फलंदाजी करत आहेत.

MI vs KKR : पोलार्डची तीन धडाकेबाज सिक्स, केकेआरसमोर 162 धावांचे आव्हान

मुंबईकडून पोलार्डने अखेरच्या षटकात तीन षटकार ठोकल्यामुळे 161 धावा स्कोरबोर्डवर लागल्या असून केकेआरला विजयासाठी 162 धावांची गरज आहे.

MI vs KKR: सूर्याकुमार 52 धावा करुन बाद

पॅट कमिन्सने सूर्यकुमारला 52 धावांवर सॅमच्या हाती झेलबाद केलं आहे.

MI vs KKR : चौकार ठोकत सूर्याचं अर्धशतक पूर्ण

सूर्यकुमारने यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. त्याने 34 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

MI vs KKR : तिलक-सूर्यकुमारने सावरला डाव

सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मुंबईचा डाव सावरला आहे. 18 षटकानंतर मुंबईचा स्कोर 129 वर 3 बाद आहे.

MI vs KKR : मुंबई इडियन्सला मोठा झटका, ईशान बाद

मुंबईचा तिसरा गडीही तंबूत परतला असून 11 षटकानंतर मुंबईची अवस्था 55 वर 3 बाद अशी आहे. 

MI vs KKR : रोहित शर्मा बाद

रोहित शर्मा 3 धावा करून बाद (6-1)

MI vs KKR : मुंबई अंतिम 11  

MI vs KKR : रोहित शर्मा (कर्णधार) ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डी. ब्रेव्हिस, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी. 

MI vs KKR : केकेआरने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकली असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

MI vs KKR : पॅट कमिन्स आज झळकणार

पॅट कमिन्स सरावासाठी मैदानात दिसल्याने तो आज सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे.


 





MI vs KKR : पोलार्ड, रसेल सरावात व्यस्त

वेस्ट इंडिजचे धाकड खेळाडू पोलार्ज आणि रसेल आज एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार असून सामन्यापूर्वी ते सराव करत आहेत.


 


 





आजवर MI vs KKR

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता मुंबईचं पारडं अगदी जड आहे. कारण मुंबईने 29 पैकी 22 सामने एकहाती जिंकत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर केकेआरला केवळ 7 सामन्यात विजय मिळवता आला आहे.

कोलकाता संभाव्य अंतिम 11

अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्थी 

मुंबईचे संभाव्य अंतिम 11  

रोहित शर्मा (कर्णधार) ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी. 


 

पार्श्वभूमी

MI vs KKR, Live Updates : आयपीएलमधील (IPL 2022) आजचा 14 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात पुण्याच्या एमसीए मैदानात होणार आहे. हा सामना मुंबईसाठी अधिक महत्त्वाचा असेल, कारण त्यांना यंदा एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. दोन पैकी दोन्ही सामने त्यांनी गमावले आहेत. तर दुसरीकडे केकेआरने तीन पैकी दोन सामने जिंकल्याने त्यांचं आव्हान मुंबईसाठी अवघड असेल.


दोन्ही संघाचा आजवरचा इतिहास पाहता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता मुंबईचं पारडं अगदी जड आहे. कारण मुंबईने 29 पैकी 22 सामने एकहाती जिंकत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर केकेआरला केवळ 7 सामन्यात विजय मिळवता आला आहे.  


कसा आहे पिच रिपोर्ट?


आज सामना होणाऱ्या पुण्यातील एमसीए मैदानाची खेळपट्टी पाहता दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणारे गोलंदाज स्कोर डिफेन्ड करण्यात यशस्वी राहिले आहेत. तसंच दवाचाही अधिक इफेक्ट जाणवला नसल्याने नाणेफेक जिंकणारा संघ आज प्रथम फलंदाजी करु इच्छित असेल. एक मोठी धावसंख्या निर्माण करुन प्रतिस्पर्धी संघाला कमी धावात रोखण्याचे मनसुबे नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच बांधणार असेल.


मुंबईचे संभाव्य अंतिम 11  


रोहित शर्मा (कर्णधार) ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी. 


केकेआरचे संभाव्य अंतिम 11 


अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्थी 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.