Longest Six in IPL History : आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात होऊन 15 वर्ष झाली आहेत. आयपीएलला जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा म्हणून ओळखले जाते. प्रत्येकवर्षी विक्रमांवर विक्रम होत असतात. षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक षटकारांचा विक्रम वेस्ट विंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. पण आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार कुणी मारलाय माहित आहे का? 

पंजाबचा विस्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन याने गुजरातविरोधात मोहम्मद शामीच्या चेंडूवर तब्बल 117 मीटर लांब षटकार लगावला. लिव्हिंगस्टोनच्या या षटकारानंतर क्रिकेट चाहते आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर सोशल मीडियावर मिम्स आणि ट्वीटचा धुमाकूळ सुरु झाला. लिव्हिंगस्टोनचा षटकार पाहून अनेकांनी डोळे विस्फारले... पण थांबा... लिव्हिंगस्टोन याने मारलेला षटकार सर्वात लांब नाही...आयपीएलच्या इतिहासात यापेक्षाही लांब षटकार लगावण्यात आले आहेत. लिव्हिंगस्टोन याने लगावलेला हा षटकार आयपीएलच्या इतिहासातील दहावा लांब षटकार होता.. याआधी नऊ जणांनी त्यापेक्षा जास्त लांब षटकार लगावण्याचा कारनामा केलाय... 

आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार चेन्नईच्या खेळाडूच्या नावावर आहे. 2008 मध्ये एबी मॉर्केल याने तब्बल 125 मीटर लांबीचा षटकार लगावला होता. दुसऱ्या क्रमांकावर पंजाबच्या प्रवीण कुमारचा क्रमांक लागतो. प्रवीण कुमारने 124 मीटर लांब षटकार लगावला होता. सर्वात दूर षटकार लगावणाऱ्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये धोनी, विराट, रोहित शर्मा यांचा समावेश नाही. 

आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार लगावणारे खेळाडू.....

क्रमांक वर्ष खेळाडू संघ किती दूर? (in meters)
1 2008 एबी मॉर्केल चेन्नई 125
2 2011 प्रवीण कुमार पंजाब 124
3 2011 एडम गिलख्रिस्ट पंजाब 122
4 2010 रॉबिन उथप्पा आरसीबी 120
5 2013 ख्रिस गेल आरसीबी 119
6 2009 युवराज सिंह पंजाब 119
7 2008 रॉस टेलर आरसीबी 119
8 2017 गौतम गंभीर कोलकाता 117
9 2016 बेन कटींग हैदराबाद 117
10 2022 लियाम लिव्हिंगस्टोन पंजाब 117