Impactful IPL Uncapped Players : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होऊन महिन्याचा कालावधी उलटलाय. आतापर्यंत झालेल्या सामन्यात युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. या खेळाडूंनी दमदारी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. क्रिकेट एक्सपर्ट्सही प्रभावित झाले आहे. यामध्ये अशा काही खेळाडू आहेत, त्यांना अद्याप भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. पाहूयात यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी कऱणाऱ्या अनकॅप खेळाडूबदद्दल...  


अभिषेक शर्मा - 
सनराइजर्स हैदराबादच्या अष्टपैलू अभिषेक शर्माने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना अभिषेक शर्माने धावांचा पाऊस पाडलाय. अभिषेक शर्माने 36 च्या सरासरीने 324 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा चोपणाऱ्या फलंदाजामध्ये अभिषेक शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे.  


तिलक वर्मा
मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करता आली नाही. पण तिलक वर्माने वादळी फंलदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिलक वर्माने मुंबईकडून सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि पोलार्डपेक्षाही तिलक वर्माच्या नावावर जास्त धावा आहेत. तिलक वर्माने 43 च्या सरासरीने 307 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये दोन अर्धशतकाचा समावेश आहे. 


राहुल तेवतिया
फिनिशिंट स्किलमुळे गुजरात टायटन्सच्या अष्टपैलू राहुल तेवातियाने सर्वांचे लक्ष वेधलेय. गुजरातच्या विजयात राहुल तेवतियाचा मोठा वाटा आहे. राहु तेवतियाने नऊ डावा 190 धावा चोपल्या आहेत.  


उमरान मलिक 
उमरान मलिकने वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी फलंदाजाचे कंबरडे मोडले. उमरान मलिकच्या वेगापुढे फलंदाज गुडघे टेकताना दिसत आहे. उमरान मलिकने नऊ सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये एका डावात पाच विकेटचाही समावेश आहे.  


मुकेश चौधरी
दीपक चाहरच्या अनुपस्थितीत मुकेश चौधरीने चेन्नईसाठी गोलंदाजीची धुरा सांभाळली. मुकेश चौधरीने आपल्या स्विंगने सर्वांचे लक्ष वेधले. मुकेश चौधरीने आतापर्यंत 11 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये एका डावातील चार विकेटचा समावेश आहे.