LSG vs RCB : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु या दोन संघात सामना होणार आहे. गुणतालिकेत यंदा चांगल्या स्थानावर हे दोन्ही संघ असल्याने त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लखनौने यंदा 6 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. तर बंगळुरुने देखील 6 पैकी 4 सामने जिंकले असले तरी रनरेट कमी असल्यामुळे ते तिसऱ्या स्थानावर आहेत.


आज होणाऱ्या लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (LSG vs RCB) या सामन्यात जिंकणारा संघ पाच विजयांसह नेटरनरेट चांगला असल्यास गुजरातला मागे टाकून पहिल्या स्थानी जाऊ शकतो. पण दोन्ही संघानी आतापर्यंत तरी समसमान विजय मिळवल्याने आजचा सामना चुरशीचा होणार यात शंका नाही. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज 19 एप्रिल रोजी होणारा लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-