PKBS Vs RR Head to Head: आज पंजाब आणि राजस्थानमध्ये रंगणार सामना, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
PBKS vs RR Head To Head: पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज आयपीएल 2022 चा 52 वा सामना खेळला जाणार आहे.

PBKS vs RR Head To Head: पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज आयपीएल 2022 चा 52 वा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. यंदाच्या हंगामात राजस्थानच्या संघानं आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामने जिंकले आहेत. तर, चार सामन्यात पराभव स्वीकारला आहे. दुसरीकडं पंजाबच्या संघानं दहा सामन्यांपैकी पाच सामन्यात विजय आणि पाच सामन्यात पराभव पत्कारला आहे. आजच्या सामन्यात पंजाबच्या संघाला पराभूत करून राजस्थानचं प्लेऑफच्या शर्यतीतील अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल.
पंजाब विरुद्ध राजस्थान हेड टू हेड रेकॉर्ड
पंजाब आणि राजस्थान आतापर्यंत 23 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी राजस्थान रॉयल्सनं 13 सामने जिंकले आहेत. तर, पंजाबच्या संघानं दहा सामन्यात विजय मिळवला आहे.राजस्थाननं प्रथम फलंदाजी करताना 7 सामने जिंकले आहेत. तर लक्ष्याचा पाठलाग करताना सहा सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, पंजाबनं प्रथम फलंदाजी करताना 7 सामने आणि लक्ष्याचा पाठलाग करताना तीन सामने जिंकले आहेत. पंजाबविरुद्ध राजस्थानचा सर्वाधिक धावसंख्या 223 इतकी आहे. तर, 124 ही सर्वात कमी धावसंख्या आहे. पंजाबच्या संघानं राजस्थानसमोर सर्वाधिक 226 धावसंख्या केली होती. तर, राजस्थानविरुद्ध पंजाबचा संघ एकदा 112 धावांवर ऑलआऊट झाला होता.
'या' चार संघाची टॉप 4 मध्ये एन्ट्री
गुजरातचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. गुजरातचा संघ प्लेऑफसाठी जवळपास पात्र ठरला आहे. गुजरातसोबतच लखनौ, राजस्थान आणि बंगळुरूच्या संघांचा टॉप-4 मध्ये समावेश आहे. लखनौचे 7 सामने जिंकून 14 गुण झाले आहेत. तर राजस्थान आणि बंगळुरूनं 6-6 सामने जिंकले असून त्यांचे 12 गुण आहेत.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
