India vs England Second Test बर्मिंघम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीला 2 जुलै रोजी सुरुवात होणार आहे. इंग्लंडनं एक पाऊल पुढं टाकलं आहे, त्यांनी संघ जाहीर केला आहे. पहिल्या कसोटीतील विजयी संघामध्ये इंग्लंडनं बदल केलेला नाही. जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही यासंदर्भात तर्क वितर्क सुरु होते. भारताचे सहायक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी जसप्रीत बुमराह दुसरी कसोटी खेळणार की नाही यासंदर्भात चित्र स्पष्ट केलं आहे. रयान टेन डोशेट यांनी जसप्रीत बुमराह दुसरी कसोटी खेळण्यास तयार असल्याचं म्हटलं.  

जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीसाठी तयार 

भारतीय क्रिकेट टीमचे सहायक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी म्हटलं की, बुमराहनं सांगितलं आहे, तो खेळण्यास तयार आहे. तो मालिकेत त्याची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. जसप्रीत बुमराह जितका करु शकतो तो तितका प्रयत्न करत आहे. मात्र, आतापर्यंत आम्ही  निर्णय घेतलेला नाही तो खेळेल की नाही. डोशेट म्हणाले की, मी  त्याला विचारलं खेळपट्टी कशी आहे, इथलं वातावरण कसं आहे. डोशेटनं म्हटलं की तुम्ही त्याला सराव करताना पाहिलं असेल. ट्रेनिंगच्या वेळी आजही तो आला होता.  

डोशेट पुढं म्हणाले की,जसप्रीत बुमराहनं एजबेस्टननंतर लॉर्डस, मँचेस्टरआणि ओवलसाठी तो स्वत: ला कशा प्रकारे तयार करत आहे ते पाहणार आहे. डोशेट यांच्या बोलण्यावरुन जसप्रीत बुमराह तीन ऐवजी चार कसोटी सामने खेळू शकतो असा अंदाज लावता येऊ शकतो. 

जसप्रीत बुमराह जर दुसरी कसोटी सामना खेळला नाही तर नितीश कुमार रेड्डीला कसोटी संघात स्थान मिळू शकतं. जर वेगवान गोलंदाज निवडायचा असेल तर अर्शदीप सिंग आणि आकाश दीप यांची नाव आघाडीवर आहेत.  

इंग्लंडचा संघ जाहीर 

बेन स्टोक्स (कॅप्टन ), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स,  जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जेमी स्मिथ, जोश टंग  आणि क्रिस वोक्स.