MI vs KKR : मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata knight Riders) संघातून युवा गोलंदाज रसिख सलाम डार (Rasikh Salam Dar) याला संधी मिळाली. त्याने यंदा केकेआरकडून पहिलाच सामना खेळला, दरम्यान आयपीएलच्या महालिलावात केकेआरने 22 वर्षीय युवा गोलंदाज रसिखला 20 लाख रुपयांमझ्ये खरेदी केलं होतं. तर मूळचा जम्मू-काश्मीरचा असणारा हा युवा गोलंदाज रसिखच्या कारकिर्दीवर एक नजर फिरवूया... 


लागली होती बंदी


तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की रसिख अवघ्या 22 वर्षांचा असून याआधी त्याच्यावर दोन वर्षांची बंदी देखील लागली होती. बीसीसीआयने फसवणूकीच्या आरोपाखाली त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली होती. त्याला आधी अंडर-19 संघात संधी मिळाली होती, पण नंतर या वादामुळेच त्याला बाहेर पडावे लागले. त्याला पुन्हा संधी मिळेल अशी आशा होती. त्यानुसार बुधवारी केकेआर संघातून तो पुन्हा एकदा मैदानात उतरताना दिसला. त्याने याआधी टी20 कारकिर्दीमध्ये 6 टी20 सामन्यात 53 च्या सरासरीने 4 विकेट्स घेतले आहेत.  38 रन दे 3 विकेट्स घेणं हे त्याचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. 


तीन वर्षानंतर परतला मैदानात


जम्मू-काश्मीरचा हा गोलंदाज बुधवारी तीन वर्षानंतर मैदानात उतरला. त्याने शेवटचा सामना मुंबई इंडियन्सकडून 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला होता. ही त्याची आय़पीएलमधील डेब्यू मॅच होती. यावेळी त्याने 4 ओव्हरमध्ये 42 धावा केल्या होत्या. याशिवाय फर्स्ट क्लाससामन्यात त्याने 2 मॅचमध्ये 7 आणि लिस्ट-ए सामन्यांच्या 2 मॅचमध्ये 3 विकेट्स घेतले आहेत. बुधवारी त्याने केकेआरकडून मुंबईविरुद्ध 3 षटकं टाकत 18 धावा दिल्या.  


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha