CSK vs PBKS: आयपीएल 2022 चा उत्साह दिवसेंदिवस वाढत जात आहे. एकापेक्षा एक वरचढ सामने क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या अकराव्या सामन्यात पंजाबनं चेन्नईच्या संघाचा 54 धावांनी पराभव केला. दरम्यान, पंजाबच्या संघात एक युवा फलंदाज रोहित शर्माचा मोठा चाहता आहे. तसेच त्याला रोहित शर्मासारखी फलंदाजी करायची आहे, अशीही इच्छा त्यानं व्यक्त केलीय.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज ओडियन स्मिथला पंजाबच्या संघानं विकत घेतलं होतं. दरम्यान, चेन्नईविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या अकराव्या सामन्यात पंजाबनं विजय मिळवला आहे. या सामन्यात ओडियन स्मिथनं चांगली फलंदाजी केली. या सामन्यानंतर ओडियन स्मिथनं रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलं. तो रोहित शर्माचा मोठा चाहता असल्याचं त्यानं म्हटलं. तसेच त्याला रोहित शर्मासारखी फलंदाजी देखील करायची असल्याचं त्यानं म्हटलंय. फलंदाजी करताना रोहित शर्माचा विचार आक्रमक असतो. तो अतिशय स्फोटक पद्धतीनं चेंडूवर प्रहार करतो. मलाही अशाच पद्धतीनं क्रिकेट खेळायचं, असंही स्मिथ ओडियननं म्हटलं आहे.
ओडियन स्मिथ पहिल्यांदा प्रकाशझोतात आला जेव्हा भारतीय संघाच्या विरोधात त्याने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तेव्हापासूनच अंदाज वर्तवला जाऊ लागला की, आयपीएलच्या भव्य लिलावात त्याला मोठी रक्कम मिळेल आणि असेच झाले. पंजाबकडून आयपीएलमध्ये पदापर्ण करणारा ओडियन स्मिथनं आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. पंजाबच्या पहिल्या सामन्यात त्यानं फक्त आठ चेंडूत 25 धावा केल्या. परंतु, दुसऱ्या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही.
हे देखील वाचा-
- IPL 2022: क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! आयपीएल सुरु असताना 'या' धाकड फलंदाजानं घेतला निवृत्तीचा निर्णय
- IPL Points Table 2022 : आतापर्यंत झालेल्या सामन्यांनंतर टॉपवर आहे राजस्थान रॉयल्स, कोणाकडे ऑरेंज आणि पर्पल कॅप?
- IPL 2022 : चेन्नईचा कोच माइक हसीचं मोईन अलीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha