SRH vs LSG : इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) मध्ये आजच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि लखनौ सुपरजायंट्स (LSG) हे दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध भिडणार आहेत. आज सायंकाळी  7:30 वाजता सुरु होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघाना विजयाची अपेक्षा असेल यात शंका नाही. त्यात पॉईंट्स टेबलचा विचार करता एका पराभवासह सनरायजर्स हैदराबाद सर्वात खाली आहे. तर लखनौ पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान दोन्ही संघाच्या चाहत्यांना आजच्या सामन्यात सर्वच खेळाडूंकडून चांगल्या खेळाची आशा असेल, पण नजर मात्र काही महत्त्वाच्या खेळाडूंवर असेल, ते खेळाडू कोणते पाहूया...


1. केएल राहुल - पंजाबचा कर्णधार केएल राहुलने मागील हंगामात कहर केला होता. त्याने धावांचा अक्षरश: पाऊस पाडला होता. यंदा दोन्ही सामन्यात त्याने खास कामगिरी केलेल नाही. दोन्हीमध्ये मिळून त्याने 40 धावा केल्या आहेत. त्यामुळे आज चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. 


2. क्विंटन डी कॉक - लखनौचा आणखी एक खेळाडू ज्याच्याकडून सर्वांना आशा असतील तो म्हणजे यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात त्याने 68 धावा केल्या असून आजही त्याच्याकडून एका विस्फोटक फलंदाजीची अपेक्षा साऱ्यांना असेल.


3. जेसन होल्डर - आजच्या सामन्यात लखनौ संघाकडून दमदार खेळाडू जेसन होल्डर संघात सामिल होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू होल्डरच्या संघात येण्याने लखनौची ताकद आणखी वाढेल.


4. केन विल्यमसन - सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसनवर संघाची मोठी भिस्त असेल. कारण त्याच्यावर कर्णधारी सांभाळण्यासह फलंदाजीची मोठी जबाबदारी असणार आहे. त्याने पहिल्या सामन्यात केवळ दोन धावाच केल्या आहेत. 


5. वॉशिग्टंन सुंदर - हैदराबाद संघाचा स्टार ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या सामन्यात तुफान अशी 40 धावांची खेळी केली होती. त्यामुळे आजही त्याच्यावर सर्वांच्या नजरा टीकून असणार आहेत. तो आज गोलंदाजी आणि फलंदाजीत कशी कामगिरी करेल हे पाहण्याजोगं ठरेल. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha