मुंबई : IPL 2022 नंतर भारतीय क्रिकेट संघ जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये दोन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 26 जून आणि दुसरा सामना 28 जून रोजी खेळवला जाईल. दोन्ही सामने मलाहाईडमध्ये खेळवण्यात येतील. क्रिकेट आयर्लंडने सोशल मीडियावर भारत-आयर्लंड टी-20 मालिकेचं वेळापत्रक जारी केलं आहे.


भारतासोबतच न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा संघ देखील आयर्लंडचा दौरा करणार आहे. आयर्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात मर्यादित षटकांची मालिकाही खेळणार आहे.




4 वर्षांनंतर आयर्लंडचा दौरा
टीम इंडियाने यापूर्वी 2018 मध्ये आयर्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यातही दोन्ही संघांत दोन सामने खेळवण्यात आले होते. दोन्ही सामन्यात भारताचाच विजय झाला होता. दरम्यान याआधी 2007 मध्ये  भारतीय संघाने पहिल्यांदा आयर्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी दोन्ही संघांमध्ये एकमेवर टी-20 सामना झाला होता, ज्यात भारताने 9 विकेट्सनी विजय मिळवला होता. भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन वनडे सामने देखील झाले होते. या सर्व सामन्यात भारताचा एकतर्फी विजय झाला होता.


आयर्लंड दौऱ्यावर युवा खेळाडूंना संधी?
IPL 2022 नंतर आणि आयर्लंड दौऱ्याच्या आधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरोधात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिकात भारतातच होणार आहे. या सामन्यातील सर्व सामने 9 जून ते 15 जून दरम्यान होतील. यानंतर आयर्लंड दौरा होणार असून त्यानंतर तातडीने भारताला इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. भारतीय संघाचं हे व्यस्त वेळापत्रक पाहता आयर्लंड दौऱ्यासाठई भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी मिळू शकते.



रोहि