IPL 2022: आयपीएलच्या हंदाच्या हंगामात राजस्थानच्या खेळाडूंकडं ‘ऑरेंज’ आणि ‘पर्पल’ कॅप आहे. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या हंगामाच्या दुसऱ्या आठवड्यापासून तो ‘ऑरेंज कॅप’चा मानकरी आहे. या हंगामात त्यानं तीन शतकंही झळकावली आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज युझवेंद्र चहल विकेट घेण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर असून सध्या ‘पर्पल कॅप’ त्याच्याकडं आहे

आयपीएल 2022 ऑरेंज कॅप यादी
जोस बटलर या सीझनमध्ये दमदार खेळी करताना दिसत आहे. त्यानं 10 सामन्यांमध्ये 65.33च्या सरासरीने आणि 150.76च्या स्ट्राईक रेटनं 588 धावा केल्या आहेत. त्याच्या या धावसंखेच्या आसपास दुसरा कोणताही फलंदाजही नाही. बटलरनंतर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल यांचा नंबर लागतो. दोन शतकांसह, 451 धावा करून तो ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. ‘पंजाब किंग्ज’चा शिखर धवनही सलग धावा करत ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत सामील झाला आहे. त्यानं आतापर्यंत 369 धावा केल्या आहेत.

क्रमांक फलंदाज सामने धावा  सरासरी स्ट्राइक रेट
1 जोस बटलर 10 588 65.33 150.76
2 केएल राहुल 10 451 56.38 145.01
3 शिखर धवन 10 369 46.13 124.66
4 डेविड वॉर्नर 8 356 59.33 156.82
5 अभिषेक शर्मा 10 331 33.10 134.00

 

आयपीएल 2022 पर्पल कॅप यादी
‘राजस्थान रॉयल्स’चा गोलंदाज युझवेंद्र चहलनं यंदाच्या हंगामात आतापर्यंत 40 षटक टाकल्या आहेत. ज्यात त्यानं 7.27च्या सरासरीनं प्रत्येक षटकात धावा दिल्या आहेत आणि 15.31च्या गोलंदाजीच्या सरासरीने 19 विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच सरासरीनं प्रत्येक 15 धावांमागं युझवेंद्रला एक विकेट नक्कीच मिळाली आहे. ‘पर्पल कॅप’साठी युझवेंद्रला आता ‘दिल्ली कॅपिटल्स’चा कुलदीप यादव, ‘पंजाब किंग्ज’चा कागिसो रबाडा आणि ‘सनरायझर्स हैदराबाद’चा टी नटराजन यांच्याकडून खडतर आव्हान आहे. कुलदीप 18 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर रबाडा आणि नटराजन यांनी आतापर्यंत 17-17 विकेट्स घेतल्या आहेत. ‘पर्पल कॅप’च्या या शर्यतीत ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’चा वानिंदू हसरंगाही सामील झाला आहे. त्यानं आतापर्यंत 16 विकेट घेतल्या आहेत.

क्रमांक गोलंदाज सामने विकेट बॉलिंग एव्हरेज इकनॉमी रेट
1 युजवेंद्र चहल 10 19 15.31 7.27
2 कुलदीप यादव 10 18 17.16 8.42
3 कगिसो रबाडा 9 17 8.27 16.05
4 टी नटराजन 9 17 17.82 8.65
5 वानिंदु हसरंगा 11 16 19.00 8.21

 

हे देखील वाचा-